तराफा पी-३०५ दुर्घटनेप्रकरणी कॅप्टनविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:06 AM2021-05-22T04:06:22+5:302021-05-22T04:06:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : तराफा पी-३०५ दुर्घटनेप्रकरणी कॅप्टन राकेश बल्लावसह अन्य आरोपींविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. हवामान ...

Case filed against Captain in Raft P-305 accident case | तराफा पी-३०५ दुर्घटनेप्रकरणी कॅप्टनविरुद्ध गुन्हा दाखल

तराफा पी-३०५ दुर्घटनेप्रकरणी कॅप्टनविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तराफा पी-३०५ दुर्घटनेप्रकरणी कॅप्टन राकेश बल्लावसह अन्य आरोपींविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. हवामान खात्याने चक्रीवादळाबाबत सूचना दिली असतानाही कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

तराफ्यावरील मुख्य अभियंता रेहमान शेख यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी यात, ३०४ (२), ३३८, ३४ भादंवि कलमानुसार गुन्हा नोंदवला. या दुर्घटनेत तराफ्यावरील एकूण ४९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. यापैकी २४ मृतदेहांची ओळख पटली असून, उर्वरित मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. ४९ मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पंचनामे सुरू आहेत.

सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेबाबत यलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपासासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. चौकशीअंती यात आणखी किती जणांचा सहभाग आहे, हे स्पष्ट होईल, त्यानुसार सबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

....................................................

Web Title: Case filed against Captain in Raft P-305 accident case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.