पालिकेच्या पाच अभियंत्यांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Published: May 5, 2016 02:24 AM2016-05-05T02:24:41+5:302016-05-05T02:24:41+5:30

भ्रष्टाचाराच्या दलदलीमुळे बदनाम झालेल्या महापालिकेच्या बांधकाम विभागातील आणखी एक भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. दादर येथील एका इमारतीत अनधिकृतपणे बांधकाम

A case has been registered against five Municipal Commissioner | पालिकेच्या पाच अभियंत्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पालिकेच्या पाच अभियंत्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Next

मुंबई : भ्रष्टाचाराच्या दलदलीमुळे बदनाम झालेल्या महापालिकेच्या बांधकाम विभागातील आणखी एक भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. दादर येथील एका इमारतीत अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आले असतानाही त्यांना पालिकेने भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) दिल्याचे स्पष्ट झाले आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली. त्यामुळे पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाचे उपमुख्य अभियंता अनावकर यांच्यासह पाच अभियंते, विकासक व वास्तुविशारद यांच्याविरुद्ध बुधवारी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमलाकर शेणॉय यांनी आरटीआयमधून माहिती उपलब्ध करून हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला. माटुंगा एफ उत्तर विभागाकडून त्यांनी मिळविलेल्या कागदपत्रातून सिव्हिक सेंटर इमारतील सीएस क्र. ४,१/४, व १/५, हे बांधकाम अनधिकृत आहे. तरीदेखील पालिकेच्या बांधकाम विभागातील अभियंत्यांनी बिल्डर, आर्किटेक्ट यांच्याशी संगनमत करून इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र दिल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भायखळा (प़) येथील बांधकाम प्रस्ताव विभागातील अनावकर यांच्यासह कार्यकारी अभियंता एन.पी. माने, साहाय्यक अभियंता एन.एस. रांगणेकर व उपअभियंता एम.के. असुदानी, विकासक मेसर्स फाइन टोन रिअल्टर्स प्रायव्हेट लि़ या कंपनीचे कार्यकारी संचालक रमाकांत जाधव व वास्तुविशारद विलास अवचट यांच्याविरुद्ध शासनानी फसवणूक, आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

नियमांची पायमल्ली
सिव्हीक सेंटर इमारतील सीएस कं्र.४,१/४, व १/५, हे बांधकाम अनधिकृत असूनही या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र दिले.

Web Title: A case has been registered against five Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.