मुंबई : आरोपीचे वय १६ ठेवावे का? यावरून वाद सुरु असतानाच नागपाड्यात चिमुरडीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलावर पहिल्यांदाच सत्र न्यायालयात खटला चालणार आहे. पैशांसाठी चिमुरडीची हत्या करण्यामागची मानसिकता प्रौढच आहे. त्यामुळे आरोपीवर ज्युएनाईल बोर्डात खटला न चालवता सत्र न्यायालयात चालविण्याबाबत जे.जे मार्ग पोलिसांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले.नागपाड्यात राहणा-या तरुन्नम फातमा उर्फ जुनेरा मुमताज खान या साडे तीन वर्षाच्या चिमुरडीची १ कोटीच्या खंडणीसाठी ५ डिसेंबर रोजी हत्या केली. अपहरणकर्त्यांनी १९ डिसेंबरला मुलीच्या आई वडिलांकडे खंडणी मागितली. २४ डिसेंबरला मुलीचा मृतदेह सापडला. त्यानंतर चौकशीत शेजारी राहणाºया एक १६ वर्षाच्या तर एक १७ वर्षाच्या आरोपीचा समावेश आहे.मुलीच्या वडिलांनी नवी गाडी घेतली होती. ते पाहून यांच्याकडे भरपूर पैसे असतील असा विचार या मुलांनी केला आणि लालसेपोटी हा गुन्हा केला. त्याने विचार करुन, कट रचून ही हत्या केली आहे. यातील १६ वर्षाचा आरोपी हा मुख्य सूत्रधार होता. अशावेळी दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांना ज्युएनाईल बोर्डपुढे हजर करण्यात आले. मंगळवारी ज्युएनाईल बोर्डापुढे सुनावणी झाली. त्यांनी त्यांची बाजू बोर्डाला पटवून दिली. तेव्हा त्यांनी पोलिसांच्या बाजूने निकाल दिला. दोघांवर सज्ञानाप्रमाणे खटला चालविण्यास मान्यता दिली. हा खटला पुढे सत्र न्यायालयात वर्ग केला आहे.
चिमुरडीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन आरोपीवर सत्र न्यायालयात खटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 1:08 AM