पवई किडनी रॅकेटप्रकरणी आरोपपत्र दाखल

By admin | Published: October 11, 2016 05:57 AM2016-10-11T05:57:03+5:302016-10-11T05:57:27+5:30

पवईतील हिरानंदानी रुग्णालयातील किडणी रॅकेटप्रकरणी पवई पोलिसांनी अंधेरी न्यायालयात १ हजार पानांचे दोषारोपपत्र सादर केले

In case of Powai kidney racket, chargesheet filed | पवई किडनी रॅकेटप्रकरणी आरोपपत्र दाखल

पवई किडनी रॅकेटप्रकरणी आरोपपत्र दाखल

Next

मुंबई : पवईतील हिरानंदानी रुग्णालयातील किडणी रॅकेटप्रकरणी पवई पोलिसांनी अंधेरी न्यायालयात १ हजार पानांचे दोषारोपपत्र सादर केले आहे. यामध्ये दोन डॉक्टरांसह चार जणांना पोलिसांनी पसार घोषित केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचा अहवाल आल्यानंतर, दोन्ही डॉक्टरांबाबत निर्णय घेण्यात येणार असून, रॅकेटमधील ब्रीज किशोर जैस्वाल याचा मृत्यू झाल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.
पवईच्या हिरानंदानी रुग्णालयात सुरू असलेल्या किडणी रॅकेटचा जुलै महिन्यात पदार्फाश करून, पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करत रुग्णालयाचे सीईओ डॉ. सुजीत चॅटर्जी, डॉ. मुकेश शेट्टे, डॉ. मुकेश शहा, डॉ. प्रकाशचंद्र शेट्टी, डॉ. कर्नल अनुराग नाईक यांच्यासह आरोपी भजेंद्र हिरालाल भिसेन, ब्रिजकिशोर जैस्वाल, त्याचा पुत्र किशन जैस्वाल, इक्बाल सिद्धीकी, भारतभूषण शर्मा, नीलेश कांबळे, ख्वाजा पटेल, युसूफना दिवाण, शोभना दिनेशभाई ठाकूर उर्फ शोभादेवी यांना अटक केली होती.
रॅकेटमधील आरोपी ब्रिजकिशोर जैस्वाल याचा मधल्या काळात गुजरातमधील राहत्या घरात मृत्यू झाला. याच्या वैद्यकीय अहवालासोबतच अनेक पुरावे आरोपपत्रासोबत जोडले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: In case of Powai kidney racket, chargesheet filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.