लीलावती रुग्णालयाच्या माजी विश्वस्तांवर गुन्हा दाखल; ८५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 13:52 IST2025-01-02T13:52:06+5:302025-01-02T13:52:21+5:30

दाखल एफआयआरनुसार, २००० ते २०२३ दरम्यान, ‘कथित विश्वस्त’ चेतन विजय मेहता, रश्मी मेहता आणि भावीन मेहता यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून ट्रस्टचे नियंत्रण बळकावले, असा दावा तक्रारदाराने  केला आहे. 

Case registered against former trustees of Lilavati Hospital; Case of fraud of Rs 85 crore | लीलावती रुग्णालयाच्या माजी विश्वस्तांवर गुन्हा दाखल; ८५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण

लीलावती रुग्णालयाच्या माजी विश्वस्तांवर गुन्हा दाखल; ८५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण

मुंबई : जवळपास ८५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी लीलावती रुग्णालयाच्या माजी विश्वस्तांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. सध्याचे ट्रस्टी मोहित माथूर यांच्या तक्रारीवरून सोमवारी वांद्रे पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

दाखल एफआयआरनुसार, २००० ते २०२३ दरम्यान, ‘कथित विश्वस्त’ चेतन विजय मेहता, रश्मी मेहता आणि भावीन मेहता यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून ट्रस्टचे नियंत्रण बळकावले, असा दावा तक्रारदाराने  केला आहे. 

वकिलांची फी, सल्लामसलत शुल्क आणि औषधे खरेदीच्या नावाखाली पैसे काढले गेले आणि वैयक्तिक वापरासाठी वापरले गेले, असे तक्रारीत म्हटले आहे. माथूर यांनी दंडाधिकारी न्यायालयात धाव घेऊन पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले होते. 

-    न्यायालयाच्या आदेशानुसार, संबंधित भारतीय दंड संहिता कलमांतर्गत फसवणूक आणि विश्वासाचा भंग केल्याबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला,  असे पोलिस अधिकाऱ्याने सांगत चौकशी सुरू असल्याचे नमूद केले.
-    रुग्णालयाच्या प्रवक्त्याकडून तसेच एफआयआरमध्ये नाव असलेल्या व्यक्तींच्या जबाबाची पोलिसांना प्रतीक्षा होती. त्यानुसार याप्रकरणी पोलिस आरोपींना नोटीस बजावतील आणि त्यांना तपासात सहभागी होण्यास सांगतील, असेही अधिकारी म्हणाले.
 

Web Title: Case registered against former trustees of Lilavati Hospital; Case of fraud of Rs 85 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.