अनधिकृत इन्स्टिट्यूट चालवल्याप्रकरणी डॉ. मनीष त्रिपाठीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:08 AM2021-08-19T04:08:52+5:302021-08-19T04:08:52+5:30

मुंबई: अनधिकृत इन्स्टिट्यूटप्रकरणी बोगस लसीकरणातील आरोपी डॉ. मनीष त्रिपाठी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका विद्यार्थिनीने याप्रकरणी ...

In the case of running an unauthorized institute, Dr. Filed a case against Manish Tripathi | अनधिकृत इन्स्टिट्यूट चालवल्याप्रकरणी डॉ. मनीष त्रिपाठीवर गुन्हा दाखल

अनधिकृत इन्स्टिट्यूट चालवल्याप्रकरणी डॉ. मनीष त्रिपाठीवर गुन्हा दाखल

googlenewsNext

मुंबई: अनधिकृत इन्स्टिट्यूटप्रकरणी बोगस लसीकरणातील आरोपी डॉ. मनीष त्रिपाठी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका विद्यार्थिनीने याप्रकरणी फसवणुकीची तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

कांदिवलीच्या डहाणूकरवाडीत राहणाऱ्या विद्यार्थिनीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, काही महिन्यांपूर्वी तिने त्रिपाठी याच्या इन्स्टिट्यूटमध्ये नर्सिंगच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला होता; मात्र एकही वर्ग घेण्यात आला नाही. त्यानुसार तिने पैसे परत मागितले; मात्र त्रिपाठीने २० हजार रुपये परत देऊ करत उरलेले पैसे ट्यूशन फीच्या नावाखाली ते स्वतःकडेच ठेवले. त्रिपाठी हा लसीकरण घोटाळ्यात सापडल्यानंतर तिने चारकोप पोलिसात धाव घेतली. त्यानुसार चारकोप पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच त्याच्या इन्स्टिट्यूटची नोंदणी अधिकृत नसल्याचीही माहिती असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Web Title: In the case of running an unauthorized institute, Dr. Filed a case against Manish Tripathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.