सरन्यायाधीशांची बदनामी करणाऱ्यांवर राजद्रोहाचा खटला भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:46 AM2018-04-25T01:46:09+5:302018-04-25T01:46:09+5:30
सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्त्रा यांच्यावर महाभियोग चालविण्याच्या काँग्रेसह सात राजकीय पक्षांच्या मागणीचे देशभरात तीव्र पडसाद उमटले.
मुंबई : सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्त्रा यांच्यावर महाभियोग चालविण्याची मागणी करून न्यासंस्थेची प्रतिमा मलिन करणारे व न्यायालयीन प्रक्रियेचे राजकीयकरण करून सामान्यांच्या मनात न्यायसंस्थेविषयी गैरसमज निर्माण करणाºया लोकांवर अवमानाची कारवाई करावी, तसेच याप्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवावा, असे निवेदन ५० हून अधिक वकिलांनी हंगामी मुख्य न्यायाधीश न्या. विजया ताहिलरमाणी-कापसे यांच्याकडे मंगळवारी केले.
सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्त्रा यांच्यावर महाभियोग चालविण्याच्या काँग्रेसह सात राजकीय पक्षांच्या मागणीचे देशभरात तीव्र पडसाद उमटले. मात्र, राज्यसभेचे सभापती या अधिकाराखाली उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेसचा हा प्रस्ताव तांत्रिक कारणे देत फेटाळला.
मात्र, याचे पडसाद वकिलांच्या वर्तूळात पाहायला मिळाले. उच्च न्यायालयाच्या ५० हून अधिक वकिलांनी सरन्यायाधीशांवर केलेल्या आरोपांबद्दल त्यांच्यावर अवमान कारवाई करण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयात निवदेन सादर केले.
न्यायालयावर होणारे आरोप, सरन्यायाधीशांवर घेतले जाणारे आक्षेप, न्यायालयीन प्रक्रियेचे होणारे राजकारण, न्यायदानाविषयी गैरसमज निर्माण करणे व राष्ट्रविरोधी शक्तींना सहकार्य होईल, अशा भूमिका घेणाºयांविरोधात ५० हून अधिक वकिलांनी हंगामी मुख्य न्यायाधीशांना निवेदन दिले आहे, असे अॅड. प्रशांत मग्गू यांनी सांगितले. सरन्यायाधीशांवर आरोप करून न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करणाºयांवर अवमानाची कारवाई करावी व घडलेल्या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर राजद्रोहाचा खटला चालवावा, अशी विनंती आम्ही हंगामी मुख्य न्यायाधीशांना केली आहे, असेही मग्गू यांनी सांगितले.