मुंबई : बँक खाती आधार कार्डशी संलग्न न केल्यामुळे, तब्बल २२ हजार अंगणवाडी कर्मचा-यांचे मानधन रखडले आहे. या वर्षाअखेरपर्यंत सर्व कर्मचा-यांची बँक खाती आधार कार्डसोबत जोडण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार असून, तोपर्यंत या कर्मचाºयांचे वेतन पूर्वीच्याच पद्धतीने रोखीने देण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला आहे.अंगणवाडी कर्मचाºयांचे त्यांच्या बँक खात्यात मानधन जमा करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने प्रणाली विकसित केली आहे. राज्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांची संख्या २ लाख ७ हजार इतकी आहे. यापैकी १ लाख ८५ हजार अंगणवाडी कर्मचाºयांची खाती नव्या प्रणालीशी जोडली असून, त्यांचे मानधन थेट बँक खात्यांत जमा होत आहे. उर्वरित साधारण २२ हजार अंगणवाडी कर्मचाºयांचे जून २०१७ पासूनचे मानधन रखडले आहे. या कर्मचाºयांना जून ते डिसेंबर २०१७ पर्यंतचे मानधन रोखीने देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील जीआर विभागाने जारी केला आहे.
अंगणवाडी कर्मचा-यांचे प्रलंबित वेतन रोखीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 5:51 AM