लाचखोर उपअधीक्षकाच्या मुंबईतील फ्लॅटमधून २४.८४ लाखांची रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:06 AM2021-07-25T04:06:42+5:302021-07-25T04:06:42+5:30

एसीबीच्या कारवाईचा फास लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लाचखोर पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रामकरण पाल याच्या मुंबईतील फ्लॅटची लाचलुचपत ...

Cash worth Rs 24.84 lakh seized from Mumbai flat of corrupt deputy superintendent | लाचखोर उपअधीक्षकाच्या मुंबईतील फ्लॅटमधून २४.८४ लाखांची रोकड जप्त

लाचखोर उपअधीक्षकाच्या मुंबईतील फ्लॅटमधून २४.८४ लाखांची रोकड जप्त

Next

एसीबीच्या कारवाईचा फास

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लाचखोर पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रामकरण पाल याच्या मुंबईतील फ्लॅटची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) झडती घेतली. यावेळी येथून २४ लाख ८४ हजारांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. त्याचे व कुटुंबातील सदस्यांचे बँक व्यवहार व अन्य मालमत्तेची कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.

दीड कोटी रुपयांच्या लाचेतील दहा लाखांचा पहिला हप्ता घेताना राजेंद्र पाल व त्याचा ऑर्डली कॉन्स्टेबल गणेश लक्ष्मणराव चव्हाण यांना एसीबीने शुक्रवारी परभणीतील सेलू विभागाचे उपअधीक्षक कार्यालयात अटक केली आहे. त्याची अनेक वर्षे मुंबईत सेवा झाली असून, पदोन्नतीवर परभणीला बदली होण्यापूर्वी तो वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक होता. त्याचे कुटुंबीय मुंबईत राहत असून, एसीबीच्या पथकाने शनिवारी सकाळपासून त्याच्या पश्चिम उपनगरातील फ्लॅटची झाडाझडती घेतली. त्यावेळी बेहिशेबी २४.८४ लाख रुपये मिळाले. त्याचबरोबर बँकेची पासबुक व अन्य मालमत्तेचे दस्तावेजही ताब्यात घेतले आहेत.

Web Title: Cash worth Rs 24.84 lakh seized from Mumbai flat of corrupt deputy superintendent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.