Join us

लाचखोर उपअधीक्षकाच्या मुंबईतील फ्लॅटमधून २४.८४ लाखांची रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:06 AM

एसीबीच्या कारवाईचा फासलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लाचखोर पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रामकरण पाल याच्या मुंबईतील फ्लॅटची लाचलुचपत ...

एसीबीच्या कारवाईचा फास

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लाचखोर पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रामकरण पाल याच्या मुंबईतील फ्लॅटची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) झडती घेतली. यावेळी येथून २४ लाख ८४ हजारांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. त्याचे व कुटुंबातील सदस्यांचे बँक व्यवहार व अन्य मालमत्तेची कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.

दीड कोटी रुपयांच्या लाचेतील दहा लाखांचा पहिला हप्ता घेताना राजेंद्र पाल व त्याचा ऑर्डली कॉन्स्टेबल गणेश लक्ष्मणराव चव्हाण यांना एसीबीने शुक्रवारी परभणीतील सेलू विभागाचे उपअधीक्षक कार्यालयात अटक केली आहे. त्याची अनेक वर्षे मुंबईत सेवा झाली असून, पदोन्नतीवर परभणीला बदली होण्यापूर्वी तो वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक होता. त्याचे कुटुंबीय मुंबईत राहत असून, एसीबीच्या पथकाने शनिवारी सकाळपासून त्याच्या पश्चिम उपनगरातील फ्लॅटची झाडाझडती घेतली. त्यावेळी बेहिशेबी २४.८४ लाख रुपये मिळाले. त्याचबरोबर बँकेची पासबुक व अन्य मालमत्तेचे दस्तावेजही ताब्यात घेतले आहेत.