मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते गुरुवारी राज्यातील आजी-माजी आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी रोकडरहीत (कॅशलेस) आरोग्य विमा योजनेचा शुभारंभ करण्यात आला.विधानभवनाच्या समिती कक्षात पार पडलेल्या या कार्यक्रमास विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदी नेते उपस्थित होते. आमदारांसाठी कॅशलेस आरोग्य विमा योजना सुरू करण्यात आली असून याचा फायदा आमदारांना होणार आहे.विधानभवनाच्या समिती कक्षातपार पडलेल्या या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विमा कॅशलेस आरोगय योजनेच्या प्रमाणपत्राचे प्रकाशनदेखील करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या सर्व आमदारांना विमा कार्डचेदेखील वाटप करण्यात आले.
आमदारांसाठी कॅशलेस आरोग्य विमा योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 5:26 AM