Join us

जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन वेबिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:06 AM

मुंबई जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाइन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवार, ९ मार्च रोजी दुपारी तीन वाजता झूम ॲॅपवर ऑनलाइन ...

मुंबई जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाइन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवार, ९ मार्च रोजी दुपारी तीन वाजता झूम ॲॅपवर ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समिती मुंबई उपनगरचे उपायुक्त यांनी या वेबिनारचे आयोजन केले आहे. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १२वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहेत. तसेच ज्यांना पुढील शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचा आहे अशा अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती. इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राखीव प्रवर्गातून प्रवेश घेण्यासाठी जातवैधता प्रमाणपत्राची आवश्यक असते. परंतु अनेक विद्यार्थी व पालकांना वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करावा, कधी करावा याबाबत माहिती नसते. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाच्या वेळी त्यांचा गोंधळ होतो.

तसेच, जे अधिकारी, कर्मचारी सरकारी नोकरीत आहेत त्यांनाही जातवैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. जातवैधता प्रमाणपत्राचे सुलभीकरण व्हावे व अर्जदारांना लवकरात लवकर वैधता प्रमाणपत्र मिळावे व कामकाजात पारदर्शकता यावी यासाठी सरकारने ऑगस्ट-२०२०पासून ऑनलाइन सुविधा सुरू केलेली आहे. अर्जदारांना या ऑनलाइन प्रक्रियेबाबत माहिती नसते. म्हणून जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहर व मुंबई उपनगर यांनी ऑनलाइन वेबिनारचे आयोजन केले आहे.

वेबिनारमध्ये ऑनलाइन अर्ज कसा करावा, कोणकोणती कागदपत्रे सादर करावी याचे मार्गदर्शन समितीचे अध्यक्ष, उपायुक्त व संशोधन अधिकारी करणार आहेत. वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक देण्यात येत आहे.

Zoom Meeting लिंक खालीलप्रमाणे आहे.

https://us04web.zoom us/8027832431/PLEwNFp.WWXHeFRpclipvN2UVkOdz09

Meeting ID: 802 783 2431, Passcode: caste 123