बिहारचा अभ्यास करूनच जातीनिहाय जनगणना; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 07:54 AM2023-03-26T07:54:26+5:302023-03-26T07:54:40+5:30

ओबीसी आरक्षण, जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगाने विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.

Caste wise census only after studying Bihar; Information from Deputy Chief Minister Devendra Fadnavis | बिहारचा अभ्यास करूनच जातीनिहाय जनगणना; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

बिहारचा अभ्यास करूनच जातीनिहाय जनगणना; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

googlenewsNext

मुंबई :  महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणनेची मागणी वारंवार करण्यात येत आहे. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय राज्यांवर सोडला आहे. बिहारमध्ये अशा प्रकारची जातीनिहाय जनगणना करण्यात आली आहे. बिहार सरकार करीत असलेल्या ओबीसी जातीनिहाय जनगणनेचा अभ्यास करण्यात येणार असून, त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ओबीसी आरक्षण, जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगाने विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. जातीनिहाय जनगणनेचा विषय अतिशय काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. बिहार राज्य सरकार सध्या जातीनिहाय जनगणना करीत आहे. आम्ही बिहारमध्ये सध्या सुरू असलेली जातीनिहाय जनगणना पाहण्यासाठी एक समिती पाठविणार आहोत. बिहार राज्याने वापरलेले सूत्र, फॉर्म्युला येथे महाराष्ट्रात लागू होऊ शकतो का? याचा अभ्यास करणार असल्याचे त्यांनी म्हटले. जर तोच फॉर्म्युला राज्यात लागू करता येणार नसेल तर महाराष्ट्रात काय करता येईल, हे पाहून त्यानुसार निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.

Web Title: Caste wise census only after studying Bihar; Information from Deputy Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.