कासाचा पूल लालफितीतच

By admin | Published: July 16, 2014 12:46 AM2014-07-16T00:46:24+5:302014-07-16T00:46:24+5:30

डहाणू, जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर राज्यमार्गावरील ब्रिटीशकालीन कासा पूल वाहतुकीस धोकादायक झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने ३ कोटी ५७ लाखाचा निधी खर्च करून तिथे नवीन पूल बांधला

The castle pool in red | कासाचा पूल लालफितीतच

कासाचा पूल लालफितीतच

Next

डहाणू : डहाणू, जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर राज्यमार्गावरील ब्रिटीशकालीन कासा पूल वाहतुकीस धोकादायक झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने ३ कोटी ५७ लाखाचा निधी खर्च करून तिथे नवीन पूल बांधला. परंतु नवीन पुलाच्या मार्गावर असंख्य मोठी मोठी झाडे असल्याने ते कापण्यासाठी वनखात्याची परवानगी मिळण्यास दिरंगाई होत आहे. परिणामी हे नवीन पूल तयार झाले असले तरी सध्या जुन्या पुलावरूनच वाहतूक सुरू असल्याने येथे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
डहाणू-जव्हार राज्यमार्ग क्र. ३० वर सुर्या नदीवरील कासा येथे सुमारे ७५ वर्षे जुना पूल आहे. तो जुनाट, जिर्ण होऊन नादुरूस्त झाल्याने शिवाय पुलाची संरक्षक भिंत तसेच प्रत्येक पावसाळ्यात कासा पुल पाण्याखाली जाऊन वाहतुक ठप्प होत असल्याने तीथे नवीन पुलाच्या कामास मंजुरी मिळून युद्ध पातळीवर पुलाचे काम सुरू होऊन पूर्ण झाले. परंतु नवीन पुलाच्या मार्गावर असंख्य मोठ मोठी जुनी झाडे शाळेजवळ असल्याने ते कापल्याशिवय नवीन पुल मुख्य रस्त्यांशी जोडणे शक्य होत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग डहाणू यांनी वनविभागाकडे झाडे कापण्यासाठी परवानगी मागितली आहे.

Web Title: The castle pool in red

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.