अमिताभ बच्चन यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:07 AM2021-03-01T04:07:28+5:302021-03-01T04:07:28+5:30

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून, सोमवारी त्यांना रुग्णालयातून ...

Cataract surgery on Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

अमिताभ बच्चन यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

Next

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून, सोमवारी त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. बच्चन यांच्या डोळ्यावर लेझरच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवरून याची माहिती दिली. त्यांच्या लेटेस्ट ब्लॉग पोस्टमध्ये त्यांची तब्येत बिघडल्याचे आणि त्यांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचे लिहिले आहे. आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये एका ओळीत अमिताभ यांनी लिहिले, ‘मेडिकल कंडिशन, सर्जरी...’ यापेक्षा जास्त काही लिहू शकत नाही.

इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या प्रश्नचिन्हासह एक फोटो पोस्ट केला होता. ज्यातून त्यांनी त्यांच्या आरोग्याच्या अनिश्चिततेकडे इशारा केला होता. याशिवाय त्यांनी २७ फेब्रुवारीला एक ट्वीट केले आहे, ज्यात त्यांनी लिहिले होते, ‘काहीतरी गरजेपेक्षा जास्त वाढले आहे... जे कापून टाकल्यावर सर्व ठीक होऊ शकते, उद्याच समजेल कसे होईल हे.’ चाहत्यांनी ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.

Web Title: Cataract surgery on Amitabh Bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.