महिला पोलिसांसमोर ‘निर्वस्त्र’ होत म्हणाला ‘मुझे पकडो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:06 AM2021-07-18T04:06:28+5:302021-07-18T04:06:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: मेट्रोच्या कारवाईच्या दरम्यान बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिसांसमोर ‘निर्वस्त्र’ होत, ‘अब पकडो मुझे’ असे त्यांना सांगत, ...

'Catch me' | महिला पोलिसांसमोर ‘निर्वस्त्र’ होत म्हणाला ‘मुझे पकडो’

महिला पोलिसांसमोर ‘निर्वस्त्र’ होत म्हणाला ‘मुझे पकडो’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: मेट्रोच्या कारवाईच्या दरम्यान बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिसांसमोर ‘निर्वस्त्र’ होत, ‘अब पकडो मुझे’ असे त्यांना सांगत, एका इसमाने तमाशा केला. शनिवारी सकाळी कुरारमध्ये हा प्रकार घडला, ज्याचे व्हिडीओ शूटिंग करण्यात आले असून, दिंडोशी पोलिसांनी या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे.

कुरारमध्ये झोपड्यांवर कारवाईच्या दरम्यान एमएमआरडीए प्रशासनाने पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली होती. त्यानुसार, कस्तुरबा, दहिसर, आरे, वनराई, समतानगर, कुरार या परिमंडळ झोनमधील वरिष्ठ अधिकारी, तसेच पोलीस ठाण्यातील पाच महिला पोलिसांना या ठिकाणी पाचारण करण्यात आले होते. या ठिकाणी ज्या १५ झोपड्या हटवायच्या होत्या, त्यांचे पुनर्वसन प्रशासनाने केले आहे. त्यानुसार, ही कारवाई सुरू करण्यात आली. जेसीबीच्या मदतीने अन्य झोपड्या हटविण्यात आल्या. मात्र, एक कुटुंब मात्र घरातून बाहेर येण्यास तयार नव्हते. त्या कुटुंबात महिलांची संख्या अधिक असल्याने महिला पोलिसांनी पुढाकार घेत, त्यांना बाहेर निघण्यास सांगितले. बऱ्याचदा यासाठी विनंती करण्यात आली.

दरम्यान, एक इसम घरातून बाहेर पडला आणि त्याने कमरेखालील पॅन्ट आणि अंतर्वस्त्र काढून, त्याच नग्नावस्थेत महिला पोलिसांकडे पाहत ‘अब मुझे पकडो’ असे ओरडू लागला. या लाजिरवाण्या प्रकारामुळे महिला पोलीसही ओशाळल्या. तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेत, पोलीस वनराई पोलीस ठाण्यात नेले. हा सगळा प्रकार पोलिसांनी कॅमेऱ्यात शूट करून ठेवला आहे. ‘आम्ही या ठिकाणी निव्वळ बंदोबस्त करत होतो, ज्यात कोणालाही मारहाण करण्यात आलेली नाही. मात्र, महिलांसमोर असा प्रकार करणाऱ्या इसमाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असून अटक केली जाईल,’ असे दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धरणेंद्र कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. स्थानिकांना पोलिसांनी विवस्त्र करत, मारहाण केल्याचा आरोप काही राजकारण्याकडून केला जात आहे. त्याबाबत विचारले असता, यात तथ्य नसून जे काही घडले, त्याचे पुरावे पोलिसांकडे आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

फोटो मस्ट आहे

Web Title: 'Catch me'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.