कमी अंतराच्या प्रवासात आता खानपान सुविधा बंद, हवाई वाहतूक मंत्रालय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 05:54 AM2021-04-14T05:54:50+5:302021-04-14T05:55:48+5:30

CoronaVirus News : खानपानावेळी प्रवासी मास्क काढून ठेवतात. त्यामुळे कोरोना संसर्गाची शक्यता बळावते.

Catering facilities now closed for short distance travel, Ministry of Air Transport | कमी अंतराच्या प्रवासात आता खानपान सुविधा बंद, हवाई वाहतूक मंत्रालय

कमी अंतराच्या प्रवासात आता खानपान सुविधा बंद, हवाई वाहतूक मंत्रालय

Next

मुंबई : दोन तासांहून कमी अंतराच्या विमान प्रवासात आता खानपान सुविधा मिळणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हवाई वाहतूक मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. १५ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.
खानपानावेळी प्रवासी मास्क काढून ठेवतात. त्यामुळे कोरोना संसर्गाची शक्यता बळावते. शिवाय खाद्यपदार्थांचा पुरवठा करताना विमान कर्मचारी प्रवाशांच्या संपर्कात येत असल्याने प्रवाशांपासून त्यांना किंवा त्यांच्यापासून प्रवाशांना बाधा होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
‘दोन तासांपेक्षा कमी अंतराच्या विमान प्रवासासाठी हा निर्णय लागू असेल. अन्य विमानांत खानपान सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी नियम नसतील’, असे हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सहसचिव उषा पाध्ये यांनी स्पष्ट केले.
लांब पल्ल्याच्या विमानात खानपान सुविधा असली तरी त्यासाठीही नियमावली आहे. विमान कंपन्या जेवण डिस्पोजल प्लेटमध्ये देऊ शकतील. मात्र, पेयपदार्थ बंद स्वरुपात देणे बंधनकारक आहे. प्रवाशांसमोर ओतून देण्यात येणाऱ्या पेयपदार्थांवर बंदी आहे. तसे पदार्थ आधीच डिस्पोजल ग्लासमध्ये भरून प्रवाशांना देता येतील. प्रत्येक प्रवाशाला सेवा देताना नवीन ग्लोव्हज् वापरावे लागतील.

Web Title: Catering facilities now closed for short distance travel, Ministry of Air Transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.