Join us

घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये दहशत

By admin | Published: November 06, 2014 1:58 AM

तुर्भे व वाशी परिसरात घरफोडीच्या दोन घटना घडल्या आहेत. बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी एकूण १ लाख ४५ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला

नवी मुंबई : तुर्भे व वाशी परिसरात घरफोडीच्या दोन घटना घडल्या आहेत. बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी एकूण १ लाख ४५ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.तुर्भे सेक्टर २१ येथील विकास दामभिसे यांच्या राहत्या घरी घरफोडी झाली आहे. मंगळवारी रात्री कामानिमित्त घराबाहेर गेले होते. या दोन तासाच्या अवधीतच घरफोडी झाली. चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश मिळवला. यावेळी घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा १ लाख १५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.त्याचप्रमाणे वाशी सेक्टर ९ येथील रहिवासी यशवंत वऱ्हाडकर यांचे घर गेले चार दिवस बंद होते. त्या दरम्यान चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश मिळवला. घरातील एलसीडी, सोन्याचे दागिने, घड्याळ व मोबाइल असा ३१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. खारघर येथेही अनुपम मिशन सोशल वेल्फेअर सेंटर येथे चोरीची घटना घडली आहे. त्या ठिकाणी असलेली १ लाख रुपयांची रक्कम चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)