राज्यभरात आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन दिवसांत साडे सहा हजार गुह्यांची वाढ गुह्यांचा आकडा ३४ हजारांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 07:04 PM2020-04-10T19:04:55+5:302020-04-10T19:05:28+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू केलेल्या लॉकडाउनच्या काळात प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांची धरपकड़ सुरु असताना दोन दिवसांत तब्बल साडे सहा हजार गुन्हें दाखल करण्यात आले आहेत.
अफवा पसरविल्याप्रकरणी १६१ गुन्हे
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू केलेल्या लॉकडाउनच्या काळात प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांची धरपकड़ सुरु असताना दोन दिवसांत तब्बल साडे सहा हजार गुन्हें दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत पोलिसांच्या दफ्तरी तब्बल ३४ हजार ०१० गुन्हे नोंद झाले आहेत. यात, तब्बल १८ हजार ९९५ वाहने जप्त करत १ कोटी २१ लाख ९९ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तर राज्यात अफवा पसरविल्याप्रकरणी १६१ गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे.
पुण्याची यात आघाडी कायम असून ४ हजार ३१७ गुन्हे दाखल आहेत. त्यापाठोपाठ नागपूर, सोलापुरचा क्रमांक लागतो. याच काळात राज्यभरात ४६८ व्यक्तींनी ‘होम क्वारंटाइन’च्या आदेश पायमल्ली तुडवले आहे. तसेच व्हीसा नियमांचे उल्लंघन करणाºया परदेशी व्यक्तींविरोधात १५ गुन्हे नोंदवण्यात आले. सध्या सगळीकड़े जमावबंदी आणि संचारबंदी आदेश जारी करण्यात आले. अशाप्रकारे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यभरात बुधवारी पहाटे चार वाजेपर्यंत राज्यात एकूण ३४ हजार ०१० गुन्हे नोंदवून २५१० जणांना अटक करण्यात आली आहे. यात पुणे शहर(४३१७), सोलापूर शहर(२९९४ ), अहमदनगर(३२१५)नागपूर शहर(२२९९), पिंपरी चिंचवड(२६९०) येथे सर्वाधिक गुह्यांची नोंद आहे. तर मुंबईत १९३० गुन्हे दाखल आहेत. पोलीस नियंत्रणात कक्षात तक्रारीचा पाऊस सुरुच या काळात राज्य पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कोरोनाबाबत तब्बल ६० हजार ७२७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नागपुरमधून सर्वाधिक म्हणजे १८ हजार ८६ , मुंबई १६ हजार १११ कॉल्स आले आहेत. तर याबाबत बुलढाणा आणि अमरावतीतून एकही कॉल आला नसल्याची नोंद कायम आहे.
....................................
राज्यात अफवा पसरविल्याप्रकरणी १६१ गुन्हे करोनाबाबत अफवा पसरवून दहशत निर्माण करणाºया आणि या साथरोगाला धार्मिक रंग देत दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांविरुद्ध राज्याच्या सायबर विभागाने महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये शुक्रवारपर्यन्त १६१ गुन्हे एप्रिल २०२० पर्यंत दाखल झाले आहेत .त्यामध्ये बीड २२, कोल्हापूर १३,पुणे ग्रामीण १२, मुंबई ११, जळगाव १०, जालना ९, नाशिक ग्रामीण ८, सातारा ७, , नांदेड ६ , नागपूर शहर ५ , नाशिक शहर ५, परभणी ५ ठाणे शहर ४, बुलढाणा ४, गोंदिया ३, भंडारा ३ , अमरावती ३, लातूर ३, नंदुरबार २, नवीमुंबई २, उस्मानाबाद २,हिंगोली १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे . राज्यात गुरूवारी विविध जिल्ह्यात कोल्हापूर,बीड ,जालना , लातूर ,जळगाव , परभणी , पुणे ग्रामीण ,या सर्व ठिकाणी नवीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे.या गुन्ह्यांमध्ये आरोपीनी आपल्या फेसबुक /व्हाट्सअँप व अन्य सोशल मीडियाचा (social media )वापर करून कोरोना महामारीला धार्मिक रंग देऊन आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या आहेत.