सचिन वाझे याची कारागृहात चौकशी करण्यास सीबीआयला परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:06 AM2021-07-03T04:06:01+5:302021-07-03T04:06:01+5:30

अनिल देशमुख भ्रष्टाचार प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ठेवण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या चौकशीचा ...

CBI allowed to interrogate Sachin Waze in jail | सचिन वाझे याची कारागृहात चौकशी करण्यास सीबीआयला परवानगी

सचिन वाझे याची कारागृहात चौकशी करण्यास सीबीआयला परवानगी

Next

अनिल देशमुख भ्रष्टाचार प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ठेवण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या चौकशीचा भाग म्हणून विशेष एनआयए न्यायालयाने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याची तळोजा कारागृहात चौकशी करण्याची परवानगी सीबीआयला शुक्रवारी दिली.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके भरलेली कार ठेवल्याप्रकरणी व ठाण्याचा व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या हत्येप्रकरणी एनआयएने सचिन वाझे याला अटक केली आहे. गुरुवारी सीबीआयने वाझे याची तळोजा कारागृहात चौकशी करण्याची परवानगी मिळावी, यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. कारण सध्या वाझे न्यायालयीन कोठडीत आहे. देशमुख यांच्याविरोधात सुरू असलेल्या तपासासंबंधी वाझे याचा जबाब सीबीआयला हवा आहे. देशमुख यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्या दृष्टिकोनातून सीबीआयला वाझे याचा जबाब नोंदवायचा आहे.

Web Title: CBI allowed to interrogate Sachin Waze in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.