Join us

सीबीआयकडूनही तपासाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:07 AM

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील दर महिन्याला १०० कोटी वसुलीच्या आरोप प्रकरणात केंद्रीय गुन्हा अन्वेषण ...

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील दर महिन्याला १०० कोटी वसुलीच्या आरोप प्रकरणात केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेने (सीबीआय) तपासाला वेग घेतला आहे. त्यांच्या पथकाने पोलीस उपायुक्त राजू भुजबळ व सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांच्यासह संबंधितांच्या एकूण १२ ठिकाणी घर झडती घेतली आहे. पुणे, ठाणे आदी ठिकाणच्या संशयित आरोपींसह संबंधित साक्षीदारांच्या नातेवाईकांचे जबाब नोंदविले जात आहेत.

उच्च न्यायालयाने वसुली रॅकेट व बदल्यांतील गैरव्यवहार प्रकरणी सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत केलेल्या तपासाबाबतचा अहवाल मागितला आहे. त्यामुळे मध्यंतरी रेंगाळलेल्या तपासाने पुन्हा गती घेतली आहे.

पुणे येथील कोथरुडमध्ये एसीपी संजय पाटील यांच्या तसेच उपायुक्त राजू भुजबळ यांच्या संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा गावी त्यांच्या घरी चौकशी केल्याची माहिती आहे. त्याशिवाय काही मध्यस्थांच्या ठिकाणी पाहणी करण्यात येत आहे.