सीबीआयचे ‘ऑपरेशन गरुडा’ अमली पदार्थांविरोधात देशव्यापी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 06:31 AM2022-09-30T06:31:00+5:302022-09-30T06:31:32+5:30

१७५ लोकांना अटक करण्यात आली असून १२५ नव्या गुन्ह्यांची नोंद

CBI carried out Operation Garuda in collaboration with Interpol NCB large quantity of drugs recovered mumbai | सीबीआयचे ‘ऑपरेशन गरुडा’ अमली पदार्थांविरोधात देशव्यापी कारवाई

सीबीआयचे ‘ऑपरेशन गरुडा’ अमली पदार्थांविरोधात देशव्यापी कारवाई

googlenewsNext

मुंबई : अमली पदार्थांची विक्री आणि वापरासंदर्भात सीबीआयने गुरुवारी देशव्यापी ऑपरेशन करत अनेक राज्यांत छापेमारी केली. या कारवाईदरम्यान तब्बल ६,६०० संशयितांची झडती घेत चौकशी केली. आतापर्यंत १७५ लोकांना अटक करण्यात आली असून १२५ नवे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 

इंटरपोलकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अमली पदार्थ वितरकांचे कंबरडे मोडण्यासाठी सीबीआयने इंटरपोल, नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (एनसीबी) आणि राज्य पोलिसांच्या साह्याने ‘ऑपरेशन गरुडा’ ही विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. ही छापेमारी जवळपास सर्वच राज्यांत झाली असून, महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, गुजरात मणिपूर या राज्यांत पोलीस दलाने जोमाने ही कारवाई केली. 

समुद्रमार्गे होते वाहतूक
भारतामध्ये परदेशातून येणारे अमली पदार्थ हे मोठ्या प्रमाणावर समुद्रमार्गे येत असल्याचीदेखील माहिती आहे.  गेल्या काही महिन्यांत गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरदेखील मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची जप्ती विविध यंत्रणांनी केली होती.  या व्यवसायात भारतात निवासासाठी आलेले परदेशी नागरिक तसेच स्थानिक नागरिकदेखील सहभागी असल्याची माहिती सीबीआयकडे आहे. त्यावरून कारवाई झाली.

कोणते अमली पदार्थ सापडले?
या छापेमारीमध्ये अंमली पदार्थांसोबतच अवैधरित्या विक्री होणारी मानसोपचारास लागणारी औषधेदेखील जप्त करण्यात आली. याशिवाय...

  • पाच किलो हेरॉइन
  • ३३ किलो गांजा
  • ३.३९ किलो चरस
  • ३३ किलो स्मॅक
  • ब्रफोमाईन ८७ गोळ्या, १२२ इंजेक्शन्स, ८७ सीरिंज
  • १०५ किलो ट्रामेडॉल 
  • १० ग्रॅम हश ऑइल 
  • ०.९ ग्रॅम एक्स्टसी पिल्स 
  • १ किलो अफू 
  • ३० किलो पॉपी हस्क 
  • १ किलो नशेची पावडर
  • अन्य अमली पदार्थांच्या ११ हजार गोळ्या

Web Title: CBI carried out Operation Garuda in collaboration with Interpol NCB large quantity of drugs recovered mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.