Join us

'सुशांतसिंग राजपूतप्रकरणी CBI ची मागणी, पण ED खटला दाखल करु शकते'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 2:05 PM

सुशांतसिंगच्या आत्महत्येचा सीबीआय तपास व्हावा, अशी मोठ्या प्रमाणात जनभावना आहे. पण, सरकारची इच्छा नसल्याचे दिसून येते. मात्र, याप्रकरणात मनी लॉड्रींग आणि गैरवर्तन असल्याचे समोर येत आहे

ठळक मुद्देसुशांतसिंगच्या आत्महत्येचा सीबीआय तपास व्हावा, अशी मोठ्या प्रमाणात जनभावना आहे. पण, सरकारची इच्छा नसल्याचे दिसून येते. मात्र, याप्रकरणात मनी लॉड्रींग आणि गैरवर्तन असल्याचे समोर येत आहे

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येचा महिना उलटून गेल्यानंतरही रोज या प्रकरणात नवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. आता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या तपासाबाबत राजकारणही तापू लागलं आहे. भाजपाच्या आमदारानं थेट गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून या आत्महत्येचा तपास CBIनं करावा अशी मागणी केली आहे. तर, दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी मत व्यक्त केलं आहे. 

सुशांतसिंगच्या आत्महत्येचा सीबीआय तपास व्हावा, अशी मोठ्या प्रमाणात जनभावना आहे. पण, सरकारची इच्छा नसल्याचे दिसून येते. मात्र, याप्रकरणात मनी लॉड्रींग आणि गैरवर्तन असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीकडून किमान एक ईसीआयआर दाखल करण्यात येऊ शकते, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान, हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची गरज नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही बिहार पोलीस केवळ प्राथमिक चौकशीसाठी आले होते, मुंबई पोलीस चांगल्याप्रकारे तपास करत असून सीबीआयकडे तपास देण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.  

दरम्यान, भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शुक्रवारी एक व्हिडीओ ट्विट केला. त्यात त्यांनी म्हटलं की,''अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात राज्यातील एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलीस निष्पक्ष चौकशी करू शकत नाहीत. CBI ने तात्काळ हा तपास हाती घेऊन बॉलिवूडमधील माफियांचा पर्दाफाश करावा अशी विनंती मी केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांना केली आहे. ''राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता पार्थ अजित पवार यांनीही अशीच मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास योग्य रितीनं करत नसल्याची शंका राज्यातील जनतेमध्ये निर्माण होत आहे. राज्य मंत्रीमंडळातील मुंबईत राहणाऱ्या युवा मंत्रीचा स्वार्थ या प्रकरणात दडला आहे, अशी चर्चा असल्याचे सुशांतच्या बहिणीने म्हटलंय, असेही भातखळकर म्हणाले.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतसुशांत सिंगदेवेंद्र फडणवीसअंमलबजावणी संचालनालयगुन्हा अन्वेषण विभाग