Anil Deshmukh : अनिल देशमुखांसह दोघांविरोधात सीबीआयकडून आरोपीपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 05:46 PM2022-06-02T17:46:09+5:302022-06-02T18:23:07+5:30
Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई : १०० कोटी वसुलीप्रकरणी सीबीआयकडून (CBI) आरोपपत्र (Chargsheet) दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सीबीआयने 59 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयकडून या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात सचिन वाझेला माफीचा साक्षीदार होण्याकरीता विशेष सीबीआय कोर्टाने (Special CBI Court) मंजुरी देखील दिली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
१०० कोटींच्या वसुली प्रकरणामध्ये सध्या तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष सीबीआय कोर्टात दाखल केलेला अर्ज कोर्टाने मंजूर केला होता. काही अटीशर्तींसह कोर्टाने हा अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.