सीबीआय ‘अ‍ॅक्शन मोड’वर, स्वयंपाकी नीरजची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 06:49 AM2020-08-22T06:49:17+5:302020-08-22T06:49:45+5:30

डीआरडीओ कार्यालय व सांताक्रूझ येथील एअर फोर्सच्या गेस्ट हाऊसमध्ये स्वयंपाकी नीरज सिंहची चौकशी झाली.

CBI investigates Neeraj on 'Action Mode' | सीबीआय ‘अ‍ॅक्शन मोड’वर, स्वयंपाकी नीरजची चौकशी

सीबीआय ‘अ‍ॅक्शन मोड’वर, स्वयंपाकी नीरजची चौकशी

Next

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी तपासासाठी मुंबईत दाखल झालेल्या राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने तपासाची चक्रे गतिमान केली असून मुंबई पोलिसांकड़ून सुशांतचा लॅपटॉप, मोबाइल, डायरीसह सर्व महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली.
या १० जणांच्या पथकाची सकाळीच बैठक पार पडली. डीआरडीओ कार्यालय व सांताक्रूझ येथील एअर फोर्सच्या गेस्ट हाऊसमध्ये स्वयंपाकी नीरज सिंहची चौकशी झाली. दुसऱ्या पथकाने वांद्रे पोलीस स्थानकातील उपायुक्त अभिषेख त्रिमुखे यांच्याकड़ून सुशांतचा मोबाइल, लॅपटॉप, ५ डायरी, फॉरेन्सिक रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज, शवविच्छेदन अहवाल, गळफास घेतलेला हिरवा कपडा तसेच तपासासंबंधी सर्व कागदपत्रे ताब्यात घेतले. तर तिसरे पथक अंधेरी परिसरातील एका इमारतीत चौकशीसाठी गेले.
>आत्महत्येचे रिक्रिएशन
सीबीआयच्या सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमधील फॉरेन्सिक एक्स्पर्ट सुशांतच्या घरी जाऊन आत्महत्येचे रिक्रिएशन करणार आहे. तसेच यावेळी मुंबई पोलिसांच्या फॉरेन्सिक एक्स्पर्टचा जबाबही नोंदविण्यात येणार आहे.
>उच्च न्यायालयातील याचिका निकाली
या प्रकरणी दाखल सर्व याचिका हायकोर्टाने निकाली काढल्या. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा हवाला देत मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने या याचिका निकाली काढल्या. अन्य पथक मुख्यालय तर एक पथक सर्व जबाबांच्या इंग्रजीत भाषांतरात व्यस्त होते. हे पथक डीआरडीओच्या कार्यालयातून काम
करत आहे.
>तपास अधिकाºयासह दोन आयपीएस अधिकाऱ्यांचीही सीबीआयचे पथक चौकशी करणार आहे. त्यांचेही जबाब नोंदविणार असल्याचे सूत्रांनी
दिली. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीसह तिचा भाऊ शोविकसंबंधी ताब्यात घेतलेली कागदपत्रे, बँक स्टेटमेंट तसेच त्यांच्या जबाबाची विशेष पडताळणी करण्यात आली. त्यानुसार या दोघांना लवकरच चौकशीसाठी बोलाविण्यात येणार आहे.

Web Title: CBI investigates Neeraj on 'Action Mode'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.