मुंबई पोलिसांना प्रतीक्षा सीबीआयच्या पत्राची

By admin | Published: November 11, 2015 02:18 AM2015-11-11T02:18:12+5:302015-11-11T02:18:12+5:30

कुख्यात गँगस्टर छोटा राजन ऊर्फ राजेंद्र निकाळजे याचा मुंबईसह महाराष्ट्रातील गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे.

CBI letter to Mumbai police wait | मुंबई पोलिसांना प्रतीक्षा सीबीआयच्या पत्राची

मुंबई पोलिसांना प्रतीक्षा सीबीआयच्या पत्राची

Next

मुंबई: कुख्यात गँगस्टर छोटा राजन ऊर्फ राजेंद्र निकाळजे याचा मुंबईसह महाराष्ट्रातील गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. मात्र त्या संबंधीची सर्व कागदपत्रे अद्याप मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. सीबीआयकडून त्यासंदर्भात अद्याप मागणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबई पोलीस सीबीआयच्या पत्राची प्रतीक्षा करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
छोटा राजनविरुद्ध मुंबईत ६९ व उर्वरित राज्यात ६ गुन्हे दाखल आहेत. हा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तथापि, यासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडून सीबीआयकडे पत्र गेलेले नसल्याचे सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे राजनवरील गुन्ह्यांसंदर्भात सर्व माहिती, पुरावे आणि न्यायालयात दाखल असलेले खटल्यांची
माहिती मुंबई गुन्हा अन्वेषण
शाखेला सीबीआयला पुरवायची आहे. मात्र त्यासंदर्भात त्यांच्याकडून अद्याप कसलाच पत्रव्यवहार
झालेला नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: CBI letter to Mumbai police wait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.