* मुंबईत सहा ठिकाणी धाडी
* शारदा चिट फंड घोटाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प. बंगालमधील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना केंद्रीय गुन्हा अन्वेषणने (सीबीआय) तेथील शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी मुंबईत कार्यरत असलेल्या सेबीच्या तिघा वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालये तसेच निवासस्थानी सोमवारी छापे टाकले. रात्री उशिरापर्यंत त्याची तपासणी सुरू होती.
सीबीआयच्या कारवाईमागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. शारदा घोटाळ्याप्रकरणी छापे टाकण्यात आलेले ६ अधिकारी २००९ ते २०१३ या कालावधीत कोलकाता येथे नियुक्तीला होते. घोटाळ्याशी संबंधित त्यांच्या तपासावर सीबीआयचा आक्षेप आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कसून तपासणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. चिट फंडमध्ये हजारो कोटींच्या घोटाळ्यांमध्ये अनेक राजकारणी आरोपी आहेत. त्यामुळे त्या तपासाबाबत पश्चिम बंगालच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू असताना असे छापे टाकण्यात आले आहेत.