मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने त्याचे डिलिट मेल आणि सोशल मीडियातील पोस्टची माहिती घेण्यासाठी अमेरिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना मदत मागितली आहे.
सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह त्याच्या घरात १४ जून २०२० रोजी आढळला होता. सुशांत सिंहचे डिलिट झालेले मेल आणि सोशल मीडिया पोस्टचा संबंध त्याच्या मृत्यूशी आहे का याचा तपास सीबीआय करत आहे. यासाठी तपास एजन्सीने गुगल आणि फेसबुकला याबाबतची माहिती मागितली आहे. यापूर्वीच सीबीआयने सुशांत सिंह राजपूतचा रूममेट, घरातील नोकर, जुने कर्मचारी, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि त्यांच्या कुटुंबासह अन्य लोकांचे जबाब घेतले आहेत. त्यानंतरही सीबीआयच्या हाती काही ठोस लागले नसल्याचे समजते.