मनी लॉन्ड्ररींच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती..नोटीस अन् व्हिडिओ कॉल! CBI च्या उपअधीक्षकाला गंडवले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 08:23 AM2024-05-06T08:23:28+5:302024-05-06T11:26:51+5:30

बीकेसीतील सीबीआय कार्यालयातील ५९ वर्षीय उपनिरीक्षकाच्या तक्रारीनुसार, २६ एप्रिलला दुपारी अनोळखी क्रमांकावरून फोन आला.

CBI Sub Inspector get fraud; 2 lakh looted by video calling | मनी लॉन्ड्ररींच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती..नोटीस अन् व्हिडिओ कॉल! CBI च्या उपअधीक्षकाला गंडवले

मनी लॉन्ड्ररींच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती..नोटीस अन् व्हिडिओ कॉल! CBI च्या उपअधीक्षकाला गंडवले

मुंबई : 

"हॅलो, मी दिल्ली गुन्हे शाखेतून बोलतोय. तुमच्या नावाने ड्रग्ज पार्सल आल्याचे सांगून सायबर भामट्यांनी सीबीआयचा उपअधीक्षकाला गंडविल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला. सायबर भामट्यांनी  अधिकाऱ्याला मनी लॉन्ड्ररींच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती घालून नोटीस पाठवली. एवढेच नाही तर पोलीस गणवेशात व्हिडिओ कॉल करून दोन लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. 

बीकेसीतील सीबीआय कार्यालयात उपअधीक्षक पदावर असलेल्या ५९ वर्षीय अधिकाऱ्याची फसवणूक झाली आहे. तक्रारीनुसार, २६ एप्रिल रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास कार्यालयात काम करत असताना एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. कॉलधारकाने आशीष शर्मा असे नाव असून दिल्ली गुन्हे शाखेतून अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांचे आधारक्रमांक पाठवून पडताळणी करण्यास सांगितले. आधार क्रमांक त्यांचाच असल्याचे सांगताच, दिल्ली विमानतळावर त्यांच्या नावाने आलेल्या पार्सल मध्ये ८ पासपोर्ट, ५ बँक क्रेडीटकार्ड, १७० ग्रॅम एमडी, ४ किलो ड्रग्ज आणि ४५ हजारांची रोकड असल्याचे सांगितले. पार्सल त्यांचे नसल्याचे सांगितला. त्यानंतर पुन्हा दिल्ली गुन्हे शाखेतून बोलत असल्याचे सांगून व्हॉट्सॲपवर कॉल आला. त्यावर दिल्ली पोलिसांचा लोगो होता.

या कॉलवरून मला ४९ मिनीट बोलणे केले. त्यानंतर, आधारकार्ड कोणाला दिले असे सांगुन त्यांना धमकाविण्यास सुरुवात झाली. पुढे, मनी लाँड्रीगच्या गुन्ह्यात अटक करणार असल्याची धमकी देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर, दिल्ली पोलिसांच्या नावाने नोटीस पाठवताच अधिकारी घाबरले. काही वेळाने एकाने दिल्ली पोलिसांच्या गणवेशात व्हिडीओ कॉल करून भीती दाखवली.

२८ एप्रिल रोजी सदरच्या प्रकरणात आरबीआय व्हेरीफेकीशन करणे आवश्यक असल्याचे सांगून सव्वा तीन लाख भरण्यास सांगितले. व्हेरिफिकेशन नंतर ते पैसे परत मिळणार असल्याचे सांगून ३० एप्रिल रोजी त्यांना दोन लाख भरण्यास भाग पाडले. दोन दिवसाने आधारकार्ड वापरणाऱ्या व्यक्तीला अटक केली असून भरलेली रक्कम लवकरात मिळेल असे सांगून नॉट रीचेबल झाले. अखेर, ४ मे पर्यंत पैसे न आल्याने त्यांना संशय आला. त्यांनी कार्यालयीन सहकाऱ्यांना घटना सांगितल्यावर त्यांनी हा सायबर फ्रॉड असल्याचे सांगताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, बीकेसी पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास करत आहे.

Web Title: CBI Sub Inspector get fraud; 2 lakh looted by video calling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.