Join us

१०० कोटी वसुली आरोप प्रकरणी अनिल देशमुख यांचा सीबीआय पुन्हा घेणार जबाब

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 5:58 AM

परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीचा आरोप प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदविला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात सीबीआयला देशमुख यांच्याकडे पुन्हा एकदा चौकशी करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यानुसार गुरुवारपासून सीबीआय आर्थर रॉड कारागृहात देशमुख यांच्याकडे चौकशी करीत त्यांचा जबाब नोंदविणार आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीचा आरोप प्रकरणात ईडीने देशमुख यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यात देशमुखांना अटक करण्यात आली. दुसरीकडे चांदीवाल आयोगासमोरील चौकशी देखील अंतिम टप्प्यात आहे. यातच सीबीआयने त्यांच्याकडे पुन्हा चौकशी करण्यासाठी परवानगी द्यावी, याबाबत सत्र न्यायालयात अर्ज केला होता. सत्र न्यायालयाकडून ३ ते ६ तारखेपर्यंत चौकशी करण्यास परवानगी मिळाली आहे. गुरुवारपासून सीबीआयचे पथक आर्थर रॉड कारागृहात त्यांच्याकडे चौकशी करणार आहे.

टॅग्स :अनिल देशमुखगुन्हा अन्वेषण विभाग