सीबीआयचे विशेष तपास पथक मुंबईत, महापालिकेकडून विलगीकरणातून सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 05:59 AM2020-08-21T05:59:42+5:302020-08-21T06:06:20+5:30

सीबीआयने ई-मेलवरून त्याबाबत केलेली विनंती महापालिका प्रशासनाने मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले.

CBI's Special Investigation Team in Mumbai, exemption from secession from Municipal Corporation | सीबीआयचे विशेष तपास पथक मुंबईत, महापालिकेकडून विलगीकरणातून सूट

सीबीआयचे विशेष तपास पथक मुंबईत, महापालिकेकडून विलगीकरणातून सूट

googlenewsNext

मुंबई : बहुचर्चित सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीबीआय) विशेष पथक (एसआयडी) दिल्लीहून गुरुवारी रात्री उशिरा मुंबईत दाखल झाले. उपमहानिरीक्षक मनोज शशीधरन यांच्या नेतृत्वाखालील सुमारे १५ अधिकाऱ्यांसह फॉरेन्सिक एक्स्पर्टचाही यात समावेश आहे. शुक्रवारी सकाळी ते मुंबई पोलिसांकडून या प्रकरणासंबंधीत पेपर ताब्यात घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. पहिल्या टप्प्यात हे पथक दहा दिवस मुंबईत राहणार असल्याने मुंबई महापालिकेने त्यांना विलगीकरणापासून (क्वारंटाईन ) सूट दिली आहे. सीबीआयने ई-मेलवरून त्याबाबत केलेली विनंती महापालिका प्रशासनाने मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले.
पथकात शशीधरन यांच्याशिवाय महिला उपमहानिरीक्षक गगनदीप गंभीर अधीक्षक नूपुर प्रसाद अप्पर अधीक्षक अनिल यादव या वरिष्ठ अधिकारी आणि चार निरीक्षक व अन्य उपनिरीक्षक, अंमलदाराचा समावेश आहे. मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपमहानिरीक्षक सुवेझ हक यांच्या नेतृत्वाखालील एक पथक त्यांना सहकार्य करणार आहे. मुंबई पोलीस आणि सीबीआयचे विशेष पथक यांच्यात समन्वयासाठी सुवेझ हक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकामध्ये फॉरेन्सिक एक्स्पर्ट डॉ. सुधीर गुप्ता यांचाही समावेश आहे. गुप्ता यांनी बहुचर्चित शीना बोरा हत्या, सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. या पथकामध्ये आवश्यकतेनुसार सीबीआयचे आणखी काही अधिकारी सहभागी होतील.
।असा होणार तपास : सीबीआयची एसआयडी तपासासाठी प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ३ ते ४ अधिकाºयांची एकूण सहा स्वतंत्र पथके बनवणार आहे. एक पथक मुंबई पोलिसांकडून केलेल्या तपासाची कागदपत्रे ताब्यात घेऊन त्याची शहनिशा करेल, दुसरे पथक सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, तिचे कुटुंबीय आणि अन्य संबंधितांकडे चौकशी करेल तर अन्य एक पथक सर्व फॉरेन्सिक रिपोर्ट जमा करणार आहे. काहीजण संबंधितांचे आर्थिक व्यवहार, ईडीने केलेल्या तपासाची माहिती घेतील. मृत्यूचा नेमका उलगडा होण्यासाठी सुशांतच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृत्यूचा ‘रिक्रेट क्राईम सीन’ करण्यात येईल. त्यानंतर सर्व शक्यता पडताळून नोंदी केल्या जातील.
।गृहमंत्र्यांकडून आयुक्तांना सूचना
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काहीसे बॅकफूटवर आलेल्या मुंबई पोलीस आयुक्त यांना गुरुवारी पुन्हा गृहमंत्री अनिल देशमुख यानी बोलावून घेतले. मंत्रालयात सुमारे दोन तास चर्चा करीत योग्य सूचना केल्या. त्यांनंतर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सीबीआयच्या पथकाला पूर्ण सहकार्य केले जाणार असल्याचे पत्रकांराना सांगितले.

ईडीकडून दिग्दर्शक रुमी जाफरीची चौकशी
ईडीने रिया चक्रवर्ती आणि अन्य पाच जणांवर दाखल केलेल्या मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी गुरुवारी दिग्दर्शक रुमी जाफरी याच्याकडे सुमारे ७ तास सखोल चौकशी केली. सुशांतला देण्यात आलेले मानधन, त्याच्या व्यवहाराच्या पद्धतीबाबत त्याच्याकडे विचारणा करण्यात आली.

Web Title: CBI's Special Investigation Team in Mumbai, exemption from secession from Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.