नवी मुंबईमध्ये सीबीएसईचा निकाल १०० टक्के
By admin | Published: May 29, 2016 12:35 AM2016-05-29T00:35:01+5:302016-05-29T00:35:01+5:30
सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. नवी मुंबईमध्ये सीबीएसई बोर्डाच्या एकूण २० शाळा असून सर्वच शाळांचा निकाल १०० टक्के लागला. नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ
पनवेल : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. नवी मुंबईमध्ये सीबीएसई बोर्डाच्या एकूण २० शाळा असून सर्वच शाळांचा निकाल १०० टक्के लागला. नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ शाळेतील अस्मिता जैन या विद्यार्थिनीने ९९.६ टक्के गुण मिळवून मुंबई विभागात अव्वल क्रमांक पटकावला.
नवी मुंबईत सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४,८०० च्या आसपास होती. सर्वच शाळांचा निकाल १०० टक्के लागल्याने विद्यार्थ्यांसह शाळा प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.
मुंबई विभागात दुसऱ्या क्रमांकात येण्याचा मान देखील नवी मुंबईकरांना मिळाला आहे. ऐरोली येथील न्यू होरायझन शाळेतील साई शेट्टी या विद्यार्थ्याने ९९.४ टक्के गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे
नवी मुंबईमधील २५ टक्के विद्यार्थ्यांनी
९० टक्केच्या पुढे गुण प्राप्त केले आहेत. (प्रतिनिधी)
मी दिवसातून ६ ते ७ तास अभ्यास करीत असे. यावेळी पालकांनी मला नेहमी सहकार्य केले. माझे वडील स्वत: माझा अभ्यास घेत असत. लागणारी पुस्तके तसेच सर्वच प्रकारचे शैक्षणिक साहित्य मला पालकांनी वेळेत उपलब्ध करून दिले. मी विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहे.
- अस्मिता जैन
(प्रथम क्रमांक पटकावलेली विद्यार्थिनी)