Join us

डिसेंबरमध्ये एसटी स्थानक-आगारांमध्ये सीसीटीव्ही होणार कार्यान्वित ; मुंबईतील ३, पुण्यातील २ बस स्थानकांचा समावेश

By महेश चेमटे | Published: November 09, 2017 8:52 PM

राज्यातील २५० पेक्षा जास्त एसटी स्थानकांसाठींच्या सीसीटीव्हीं निविदा खुल्या करण्यात आल्या आहेत. पाच टप्प्याच हे काम पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यातंर्गत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतील ३ आणि पुणे शहरातील २ एसटी स्थानकांमध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित होणार आहे.

ठळक मुद्देमुंबईतील मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला पुणे शहरातील स्वारगेट आणि शिवाजी नगर मॉनिटरींगसाठी स्थानकांतील वरिष्ठ अधिकाºयांना सूचना

मुंबई : एसटी महामंडळात अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या सीसीटीव्हींचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुंबईतील मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला आणि पुणे शहरातील स्वारगेट आणि शिवाजी नगर या स्थानकांवर सीसीटीव्ही कार्यरत होणार आहे. पहिल्या टप्प्यात ५७ स्थानकांमध्ये हे सीसीटीव्ही कार्यरत होणार आहेत. या सीसीटीव्हीचे मॉनिटरींग स्थानकातील वरिष्ठ अधिकारी करणार आहे.प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी स्थानकांत सीसीटीव्ही बसवणार अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली होती. मात्र घोषणेला अनेक महिने उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नव्हती. मात्र गेल्या महिन्यात निविदा जाहिर झाल्या असून खासगी कंपनीला सीसीटीव्ही बसवण्याचे कंत्राट देण्यात आले आहेत. संपूर्ण स्थानक आणि आगार परिसर सीसीटीव्हीच्या टप्प्यात येईल, अशी पद्धतीने सीसीटीव्हीची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी खासगी कंपनीचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुंबईतील तीन आणि पुण्यातील दोन ठिकाणी हे सीसीटीव्ही कार्यरत होणार असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.

काही  ठिकाणी आगार-स्थानकांच्या भिंतीवर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी स्वतंत्र पोल उभारुन सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. स्थानक आणि आगारांतील संपूर्ण परिसर टप्प्यात येण्यासाठी एका स्थानकांवर साधारणपणे आठ सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल, कुर्ला आणि परळ समवेत शिवाजी नगर व स्वारगेट स्थानकांवर सीसीटीव्ही  कार्यरत होणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या पाच ठिकाणी सीसीटीव्ही कार्यरत होणार आहेत. मॉनिटरींगसाठी स्थानकांतील वरिष्ठ अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत.

- रणजित सिंह देओल , एसटी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक..........................................