मुंबई : नायर रुग्णालयात एमआरआय मशीनमध्ये अडकून युवकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे रुग्णालय व्यवस्थापनातील त्रुटी समोर आल्या आहेत. मृत युवकाच्या नातेवाइकांना न्याय मिळायला हवा. तसेच मुंबई महापालिकेच्या ताब्यातील सर्व रुग्णालयांतील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, अशी मागणी भाजपा आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे.नायर प्रकरणानंतर लोढा यांनी सोमवारी महापालिका आयुक्त अजय मेहता यांना महापालिकेच्या ताब्यातील रुग्णालयांबाबत निवेदन दिले. तसेच कर्मचाºयांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करावी, अशी मागणीही लोढा यांनी केली. जबाबदारी निश्चित करता यावी यासाठी सर्व रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणीही त्यांनी केली.महापालिकेने मदतीची भूमिका घ्यावीनायर दुर्घटनेनंतर राज्य शासनाने मृत राजेश मारूच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर केली. मात्र, महापालिकेनेही मदतीची भूमिका घ्यायला हवी. राजेश मारूच्या पश्चात त्याच्या कुटुंबात कमावणारी व्यक्ती नाही. त्यामुळे पालिकेनेही आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी लोढा यांनी केली.
सर्व रुग्णालयांत सीसीटीव्ही बसवा - मंगल प्रभात लोढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 5:50 AM