सीसीटीव्ही कॅमेरे गायब

By admin | Published: November 11, 2014 01:09 AM2014-11-11T01:09:07+5:302014-11-11T01:09:07+5:30

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एनएमएमटी प्रशासनाने वर्षभरापूर्वी आपल्या ताफ्यातील 180 बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते.

CCTV cameras disappeared | सीसीटीव्ही कॅमेरे गायब

सीसीटीव्ही कॅमेरे गायब

Next
कमलाकर कांबळे - नवी मुंबई
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एनएमएमटी प्रशासनाने वर्षभरापूर्वी आपल्या ताफ्यातील 180 बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. मात्र त्यातील अनेक कॅमेरे गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एनएमएमटीच्या व्यवस्थापनाने गंभीर दखल घेतली असून या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत. 
परिवहन उपक्रमाच्या तुर्भे आणि आसूडगाव डेपोत सध्या 360 गाडय़ा आहेत. यात 280 साध्या, 10 मिनी आणि 70 वातानुकूलित बसेसचा समावेश आहे. या सर्व बसेस विविध 44 मार्गावर धावतात. मुंबईसह देशात होणा:या दहशतवादी हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिवहन उपक्रमाने आपल्या ताफ्यातील साध्या व वातानुकूलित अशा 180 बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. विशेष म्हणजे वातानुकूलित बसेसच्या मेन्टेनन्सचा ठेका बीओटी तत्त्वावर एका जाहिरात कंपनीला देण्यात आला आहे. त्याबदल्यात या कंपनीने हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. 
या कॅमे:यांची देखभाल करण्याची जबाबदारी सुध्दा या कंपनीवरच टाकण्यात आली होती. असे असले तरी मागील काही महिन्यांत अनेक बसेसमधील कॅमेरे चोरीला गेल्याचे दिसून आले आहे, तर काही कॅमेरे नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे एनएमएमटीच्या गाडय़ांतून विविध मार्गावरून प्रवास करणा:या हजारो प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 
एनएमएमटी प्रशासनाने अलीकडेच केलेल्या पाहणीतून जवळपास तीस बसेसमधील कॅमेरे गायब झाल्याचे आढळून आले आहे. अनेक कॅमेरे नादुरुस्त झाले आहेत, तर काही कॅमे:याची हार्डडिस्क गायब झाल्याचा प्रकारही समोर आला आहे. याची व्यवस्थापनाने गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान,आगारात  उभ्या असलेल्या बसेसमधून कॅमेरे चोरीला जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे  व्यवस्थापनाने आपल्या आगारातील सुरक्षा यंत्रणा सक्षम करावी,असे संबंधित जाहिरात कंपनीकडून व्यवस्थापनाला सांगण्यात आल्याचे समजते. 
 
ढिसाळ कारभारामुळे परिवहन सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. कोलमडून पडलेली ही सेवा सुरळीत करण्यासाठी मागील वर्षभरापासून व्यवस्थापनाकडून काही सकारात्मक पावले उचलण्यात आली. डेपोतून बाहेर पडण्यापूर्वी दररोज गाडय़ांची स्वच्छता केली जाते . नादुरुस्त असलेल्या गाडय़ा रस्त्यावर धावणार नाहीत याची दक्षता , तसेच तूट भरून काढण्यासाठी फुकटय़ा प्रवाशांवर विशेष नजर ठेवली जात आहे. असे असले तरी उपक्रमातील कर्मचा:यांना शिस्त लावण्यात मात्र व्यवस्थापनाला अपयश आल्याचे दिसून आले आहे.
 
जाहिरातीचा ठेका देताना झालेल्या करारानुसार कॅमे:यांची सुरक्षा आणि त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित जाहिरात कंपनीची आहे. यासंदर्भात सदर कंपनीला सूचना देण्यात आल्या आहेत. 
- शिरीष आरदवाड, प्रभारी व्यवस्थापक, एनएमएमटी

 

Web Title: CCTV cameras disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.