अल्पवयीन मुलाच्या हिट अँड रनमध्ये आजोबा अंथरुणावर, सीसीटीव्ही फुटेज झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 01:20 PM2023-09-15T13:20:31+5:302023-09-15T13:20:53+5:30

Mumbai: वडिलांची कार घेऊन भरधाव वेगाने निघालेल्या अल्पवयीन मुलाचे नियंत्रण सुटले आणि कार रिक्षासह आजोबांना धडकली. या अपघातात ६३ वर्षीय के. सुभरमण गंभीर जखमी झाले असून त्यांना तीन महिने सक्तीचा आराम करण्यास सांगितला आहे.

CCTV footage of minor's hit-and-run, grandpa in bed, goes viral | अल्पवयीन मुलाच्या हिट अँड रनमध्ये आजोबा अंथरुणावर, सीसीटीव्ही फुटेज झाले व्हायरल

अल्पवयीन मुलाच्या हिट अँड रनमध्ये आजोबा अंथरुणावर, सीसीटीव्ही फुटेज झाले व्हायरल

googlenewsNext

मुंबई  - वडिलांची कार घेऊन भरधाव वेगाने निघालेल्या अल्पवयीन मुलाचे नियंत्रण सुटले आणि कार रिक्षासह आजोबांना धडकली. या अपघातात ६३ वर्षीय के. सुभरमण गंभीर जखमी झाले असून त्यांना तीन महिने सक्तीचा आराम करण्यास सांगितला आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही गुरुवारी व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. मुलगा अल्पवयीन असल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मुलाला ५ हजारांच्या दंडावर सोडण्यात आले असून, याप्रकरणी साकीनाका पोलिस अधिक तपास करत आहेत.

अंधेरीत एका कॉलनीच्या गेटवर ६ सप्टेंबर रोजी हा अपघात घडला. सुभरमण हे एका खासगी फर्ममधून सल्लागार म्हणून निवृत्त झाले आहेत. दोघेही एकाच सोसायटीमध्ये राहण्यास आहेत. मुलगा घरात एकटा असल्याने त्याने जॉयराइडसाठी वडिलांच्या कारची किल्ली घेऊन खाली उतरला. कार गेटमधून डावीकडे वळवत असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारने रिक्षाला धडक देत वृद्धाला काही अंतरावर फरफटत नेले. या अपघातानंतर मुलगा तेथून पसार झाला.

म्हणून गुन्हा नाही... 
मुलगा अल्पवयीन असल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गाडी वडिलांकडून घेऊन गेला असल्याचे समोर येताच वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल. जखमींची तक्रार घेण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. याबाबतचा अहवाल बालकल्याण समितीकडे पाठविण्यात येत असल्याचे साकीनाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गबाजी चिमटे यांनी दिली.

आजोबा म्हणतात, पालकही तितकेच जबाबदार आहेत    
सुभरमण सांगतात, ६ तारखेला दुपारी ४ च्या सुमारास मी वॉकसाठी इमारतीबाहेर पडलो. त्याच, दरम्यान पाठीमागून आलेल्या कारने धडक दिली. सुरक्षारक्षकाने मदत करत कुटुंबीयांना कळविले. त्यांनी, माझ्याकडे धाव घेत जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

 पाठीला गंभीर दुखापत झाली असून चालणे शक्य नाही. डॉक्टरांनी तीन महिने बेडरेस्ट सांगितली. अपघातानंतर मुलासह त्याच्या वडिलांनी साधी चौकशीही केली नाही. पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मुलाच्या आईने माफी मागितली. 

या घटनेला पालकही तितकेच जबाबदार आहेत. गेल्या दोन महिन्यांचे सोसायटीचे सीसीटीव्ही पोलिसांना तपासण्यास सांगितले आहे. त्या मुलाने यापूर्वीही वडिलांची कार घेऊन बाहेर पडला आहे. पोलिसांनी चौकशी करत कारवाई करावी, असे आजोबांचे म्हणणे आहे. 

मुलाला पाच हजारांचा दंड
 या घटनेने परिसरात खळबळ उडाली. घटनेची वर्दी लागताच पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले. मुलाच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला. या अपघातात वृद्ध गंभीर जखमी असून त्यांना तीन महिने सक्तीचा आराम करण्यास सांगितले आहे. मुलाला ५ हजारांच्या दंडावर सोडून देण्यात आले आहे.

Web Title: CCTV footage of minor's hit-and-run, grandpa in bed, goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.