मुंबई : सागरी मार्गावर सीसीटीव्ही आणि रस्त्यालगत दोन सागरी पोलीस ठाणी उभारण्याच्या अटीवर, नाविक दलाने या प्रकल्पाला ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी महापालिका प्रशासनाला सागरी मार्गावर ही व्यवस्था ठेवणे भाग आहे.नरिमन पॉइंट ते कांदिवलीपर्यंत ३३ किलोमीटर सागरी मार्ग महापालिका बांधणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईच्या सुरक्षेत अडथळा येऊ नये, म्हणून नाविक दलाने पालिकेला काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्यात संपूर्ण सागरी मार्गावर सीसीटीव्ही लावून त्याची जोडणी नाविक दलाला द्यावी. त्याचबरोबर, दोन पोलीस ठाणी उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे. मुंबई महापालिका ११ हजार कोटी रुपये खर्च करून सागरी मार्ग उभारणार आहे. डिसेंबर २०१६ पर्यंत या प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. (प्रतिनिधी)
सागरी मार्गावर सीसीटीव्हीची नजर
By admin | Published: September 25, 2016 2:31 AM