सीडी बाजाराला पीडी आणि डाऊनलोडचा फटका

By admin | Published: September 20, 2014 11:09 PM2014-09-20T23:09:12+5:302014-09-20T23:09:12+5:30

गणोशोत्सवानंतर सीडी विक्रेत्यांना नवरात्रोत्सवात होणा:या खरेदीची अपेक्षा असते. या उत्सवात चांगला व्यवसाय होईल, अशी आशा बाळगली जाते.

CD and CD in the CD market | सीडी बाजाराला पीडी आणि डाऊनलोडचा फटका

सीडी बाजाराला पीडी आणि डाऊनलोडचा फटका

Next
ठाणो : गणोशोत्सवानंतर सीडी विक्रेत्यांना नवरात्रोत्सवात होणा:या खरेदीची अपेक्षा असते. या उत्सवात चांगला व्यवसाय होईल, अशी आशा बाळगली जाते. यंदा मात्र नवरात्रोत्सवाच्या बाजारात काहीशी मंदी आहे. त्यामुळे नवीन सीडी बाजारात आल्याच नाहीत. मोबाइलवरही गाणी डाऊनलोड केली जात असतात व पेनड्राईव्हमुळे (पीडी) तसेच नव्या मोबाइल अॅप्समुळेही सीडी मार्केटला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे नवीन सीडीच उपलब्ध नसल्यामुळे गरबाप्रेमींना जुन्याच लोकप्रिय गीतांवर गरबा खेळावा लागणार आहे. 
बाजारात खासकरून नवरात्रीसाठी नव्या गाण्यांच्या सीडी आल्या नाहीत. दांडियाची गाणी, देवीची गाणी, मराठीतील जागरण गोंधळ, गुजरातीमध्ये देवीसाठी गायली जाणारी व दांडियाची गाणी बाजारात उपलब्ध असल्याची माहिती डोंबिवलीतील सीडी विक्रेते सागर गुप्ते यांनी दिली. मराठीत नवरात्रीची 9 रूपे, खंडोबा व अंबाबाई जागरण गोंधळ या सीडी आहेत. गुजरातीमधील खलैया, पंखोडा ओ पंखोडा, ओढणी ओढू तो उडी चली जाय, ओ गोरी नवरात्र नॉनस्टॉप फाल्गुनी पाठक गीते, बाबला यांच्यासह जागरण, गजर तसेच घटस्थापनेची पूजा या सीडी बाजारात उपलब्ध आहेत.  हिंदीतील जयकारा शेरोवाली का आणि आज तेरा जगराता माँ या सीडीतील गीते सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक व गायक सोनू निगम  यांच्या आवाजात आहेत.  यापैकी पंखोडा, ओढणी, खलैया या गीतांच्या सीडींना ग्राहकांकडून विशेष पसंती आहे. घटस्थापना पूजेच्या सीडीची किंमत 125 रुपये असून इतर सीडी 55 ते 99 रुपयांर्पयत  उपलब्ध आहेत. नवरात्रीच्या गाण्यांचा पॅटर्न ठरलेला असतो. गरबा व दांडिया हा फिल्मी साँगच्या चालीवर आधारित वाद्यवृंदावर जास्त खेळला जातो. अनेक ठिकाणी गुजराती समाजाकडून आयोजित केल्या जाणा:या दांडिया व गरबा नृत्यासाठी त्याच समाजातील काही मंडळी गुजराती लोकगीते गाऊन दांडिया व गरबा नृत्यात रंग भरतात. विशेष म्हणजे त्याठिकाणी सीडी वाजवली जात नाही. 
 
4या सीडींचा व्यवसाय नवरात्रीच्या चार दिवस आधी होत असतो. 
नव्या सीडी बाजारात आल्या नसल्याने जुन्या आणि लोकप्रिय सीडींचा माल आम्ही दुकानात विक्रीसाठी ठेवला असल्याचेही गुप्ते यांनी सांगितले. 
 
4गाण्याच्या 5क् ते 6क् तर  पूजेच्या 1क् ते 15 सीडी विकल्या जातात. पेनड्राइव्ह आणि मोबाइल डाऊन लोडिंगमुळे नवीन  सीडी काढण्याचाही कोणी प्रयत्न करीत नाही. 
4यंदा प्रथमच नवरात्रीत नवीन सीडी बाजारात आल्या नाहीत. सीडी तुटण्याची शक्यता असल्याने एकदा सीडी घेतल्यावर ती लाइफलाँग जातेच, असे नाही.  
4पेनड्राइव्ह अधिक टिकाऊ असल्याने सीडीची विक्री अजून कमी झाली आहे. सीडी व्यवसाय आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. 
4केवळ जुनी लोकप्रिय गाणी आणि क्लासिकलवर हा व्यवसाय तग धरून आहे. नवरात्रीला चार दिवस बाकी आहेत. या दिवसांत कदाचित नव्या सीडी येतीलही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 

Web Title: CD and CD in the CD market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.