केईएम रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ३४ - डायलेसिस विभागात बुधवारी रात्री सिलिंग कोसळले. या दुर्घटनेत दोन रुग्ण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. केईएम रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर हा विभाग असून दुर्घटनेनंतर हा विभाग त्वरित बंद करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.या डायलेसिस विभागात ८-९ खाटांची सोय आहे. दिवसाला २०-२५ किडनी रुग्णांचे डायलेसिस करण्यात येते. येथे राज्यभरातील रुग्णांची वर्दळ असते. मात्र, रात्रीच्या वेळेस ही घटना घडल्याने मोठी जीवितहानी टळली.केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे म्हणाले की, प्लास्टर आणि एसी सिलिंग पडल्याने अपघात झाला. दोन रुग्णांना किरकोळ खरचटले आहे. रुग्णांसाठी डायलेसिस युनिट दुसºया ठिकाणी हलविण्यात येईल. येत्या तीन-चार दिवसांत डायलेसिस प्रक्रिया पूर्ववत केली जाईल.
केईएम रुग्णालयात वॉर्डमधील सिलिंग कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 2:19 AM