३१ डिसेंबर घरातच साजरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:07 AM2020-12-29T04:07:14+5:302020-12-29T04:07:14+5:30

गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे ३१ डिसेंबर ...

Celebrate 31st December at home | ३१ डिसेंबर घरातच साजरा करा

३१ डिसेंबर घरातच साजरा करा

Next

गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे ३१ डिसेंबर आणि नूतन वर्षाचे स्वागत नागरिकांनी घरी थांबूनच अत्यंत साधेपणाने करावे, असे आवाहन गृह विभागाने केले आहे.

५ जानेवारीपर्यंत रात्री संचारबंदी लागू असल्याने गेटवे, मरीन ड्राइव्ह आदी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, अशी सूचनाही करण्यात आली आहे. गृह विभागाने सोमवारी यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार, ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्रकिनारा, बाग, रस्ते अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता फिजिकल डिस्टन्सिंगचे (सामाजिक अंतर) पालन करावे. मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे.

विशेषत: मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, मरीन लाइन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते. त्यामुळे अशावेळी कोरोनाचा संसर्ग हाेणार नाही, याची नागरिकांनी काळजी घ्यावी, ६० वर्षांवरील ज्येष्ठांनी व १० वर्षांखालील मुलांनी शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, मिरवणुका काढू नयेत, असेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे.

वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिकस्थळी जातात. अशावेळी त्या ठिकाणी गर्दी न करता फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, फटाक्यांची आतषबाजी करू नये. ध्वनिप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

................................

Web Title: Celebrate 31st December at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.