Join us

बाबासाहेबांची जयंती साधेपणाने साजरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती कार्यक्रम साधेपणाने साजरे करावेत. महापालिकेच्या सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती सर्व प्रतिबंधात्मक खबरदारी घ्यावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले.

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी दादर परिसरातील चैत्यभूमी येथे महापालिकेतर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. परिसरात येणाऱ्या अनुयायांना नागरी सेवा-सुविधादेखील पुरविण्यात येतात. या वेळी अनुयायांनी जयंती दिनी शक्यतो आपआपल्या घरी थांबूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.

६ डिसेंबर २०२० रोजीच्या महापरिनिर्वाण दिनी ज्या पद्धतीची व्यवस्था करण्यात आली होती; त्याच धर्तीवर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. यामध्ये प्रामुख्याने चैत्यभूमी येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे ऑनलाइन प्रक्षेपण, दूरदर्शनसह विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांद्वारे करण्यात येणारे थेट प्रक्षेपण आदी बाबींविषयक नियोजन करावे; जेणेकरून अधिकाधिक नागरिकांना आपल्या घरी थांबूनच अभिवादन करणे शक्य होऊ शकेल. घरी राहूनच अभिवादन करण्याबाबत अनुयायांना विनंती करावी.