Join us

‘काळा शिक्षक दिवस’ साजरा करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 3:10 AM

जे शिक्षक आझाद मैदानावर निषेधासाठी येऊ शकणार नाहीत त्यांनी आपापल्या शाळेत सर्व शिक्षक यांनी काळे कपडे टोपी घालावी,

मुंबई : विनाअनुदानित शिक्षकांचे आझाद मैदानावरील आंदोलन सुरूच असून आजचा दिवस ते काळा शिक्षक दिवस म्हणून साजरा करणार आहेत. यासाठी विनाअनुदानित कृती शिक्षक समितीद्वारे शिक्षकांना आझाद मैदानावर काळे कपडे, काळे टोपी आणि काळे झेंडे घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शासनाने नुकताच विनानुदानित शाळांना २० टक्के अनुदान देण्याचे निर्णय घेतला. तसेच ज्या शाळांना २० टक्के अनुदान आहे त्यांना आणखी २० टक्के म्हणजे ४० टक्के अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र विनाअनुदानित कृती समितीने याचा निषेध करत पूर्ण १०० टक्के अनुदानाची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. यासाठी त्यांनी आपले आझाद मैदानावरील आंदोलन सुरूच ठेवले असून हा शिक्षक दिन ‘काळा शिक्षक दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

जे शिक्षक आझाद मैदानावर निषेधासाठी येऊ शकणार नाहीत त्यांनी आपापल्या शाळेत सर्व शिक्षक यांनी काळे कपडे टोपी घालावी, विद्यार्थ्यांना काळ्या फिती दंडावर बांधायला सांगाव्यात. शाळेत कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ नये असे आवाहन कृती समितीतर्फे करण्यात आल्याची माहिती प्रशांत रेडीज यांनी दिली. त्यामुळे जोपर्यंत शासन १९ सप्टेंबर २०१६ चा जी.आर रद्द करून प्रचलित नियमाने आनुदानाचे सूत्र लागू करणार नाही अंदोलन सुरुच राहणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

टॅग्स :मुंबईशिक्षक दिनशिक्षक