Join us

वांद्रे येथील सेंट टेसेसात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 1:32 PM

आघाडी सरकारने बुधवारी पहिली ते दहावी पर्यंत मराठी विषय सक्तीचा केल्याचे

मुंबई - मराठी भाषा दिनानिमित्त आज वांद्रे पश्चिम येथील सेंट टेसेसा बॉयस हायस्कूलमध्ये आज सकाळी मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विधार्थीनी छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, श्री विठ्ठल, भवानीमाता आदी बिविध व्यक्तीरेखा साकार केल्या.

आघाडी सरकारने बुधवारी पहिली ते दहावी पर्यंत मराठी विषय सक्तीचा केल्याचे स्वागत या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने देखिल केले. या शाळेत इतर धार्मिक जनताही मराठी दिवस साजरा करण्यासाठी आता पुढाकार घेत असून आम्ही सर्व एक आहोत व महाराष्ट्रत गुण्या-गोविंदयाने राहत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. आमची शाळा जरी कॉन्व्हेंट असली शाळेत विविध जाती-धर्मातील विधार्थी आहेत व नेहमीच येथे अनेक सण-समारंभ, उत्सव उत्स्फूर्तपणे साजरे केले जातात व याचा शाळेतील सर्वानाच अभिमान असल्याचे वारंवार दिसून आले आहे. सध्याच्या आघाडी सरकारने उशीरा का होईना पण पहिली  ते दहावी पर्यंत मराठी विषय सक्तीचा केल्यामुळे आनंदच झाला असल्याचे मत यावेळी सर्व शिक्षकांनी व्यक्त केले अशी माहिती येथील शिक्षक गणेश हिरवे यांनी दिली.

टॅग्स :मुंबईमराठी भाषा दिन