नववर्ष धुंदीत नव्हे, तर शुध्दीत साजरे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:08 AM2020-12-31T04:08:00+5:302020-12-31T04:08:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : समाजामध्ये व्यसनाधिनता वाढत असून यामध्ये प्रामुख्याने युवकांचे प्रमाण खूपच आहे. नवीन वर्षाची सुरुवात आपल्या ...

Celebrate the New Year in a pure way, not in a hurry | नववर्ष धुंदीत नव्हे, तर शुध्दीत साजरे करा

नववर्ष धुंदीत नव्हे, तर शुध्दीत साजरे करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : समाजामध्ये व्यसनाधिनता वाढत असून यामध्ये प्रामुख्याने युवकांचे प्रमाण खूपच आहे. नवीन वर्षाची सुरुवात आपल्या संस्कृतीनुसार आपण आनंदाने, उत्साहाने आणि नवीन वर्षाचा संकल्प ठेवून करीत असतो. परंतु ३१ डिसेंबर या दिवशी अनेक तरुण व्यसन करतात. वर्षाच्या अखेरचा दिवस व्यसनामुळे अनेकांच्या अनमोल जीवनाचाही अखेरचा ठरतो. नववर्ष धुंदीत नव्हे तर शुध्दीत साजरे करा, असे आवाहन नशाबंदी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास म्हणाल्या की, ३१ डिसेंबर या दिवशी अनेक जण व्यसन करणारे व पहिल्यांदाच व्यसन करतात म्हणून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यच्या वतीने बुधवारी सीएसएमटी नववर्ष धुंदीत नव्हे, तर शुध्दीत साजरे करा, या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पृथ्वीतलावरील कोणताही प्राणी दारू पीत नाही, तंबाखू खात नाही, चरस, गांजा यांचे सेवन करीत नाहीत. निर्बुध्दी असलेले हे प्राणी त्यांच्या आरोग्यास तसेच त्यांच्या जमातीस अपायकारक असलेल्या व्यसनांच्या सेवनापासून दूर असतात. परंतु मनुष्य प्राणी हा जगातील सर्वात बुध्दिमान असूनही तो व्यसनांना जवळ करून आपले व आपल्या समस्त मानव जातीचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच मानवावर निसर्गातील प्राण्यांचीही जबाबदारी आहे.

कार्यक्रमावेळी बलूनरूपी प्राण्यांनी आम्ही कोणतेही व्यसन करीत नाहीत, तुम्ही तर माणसे आहात, असा संदेश दिला, असे त्या म्हणाल्या.

तसेच व्यसनमुक्तीची पोस्टर्स प्रदर्शनी, स्टँडीज हे जनतेचे लक्ष वेधून माहिती देत होते. सेल्फी कॉर्नरमध्ये उपस्थित तरुणाईने तर सेल्फी काढून मित्र, मैत्रिणींना पाठविण्यात सहभाग घेतला. २०२१मध्ये मी व्यसनमुक्त राहीन अशा सह्यांच्या संकल्पाला लोक उस्फूर्त प्रतिसाद देत होते.

एकीकडे चंगळवादी, भोगवादी संस्कृती वाढत असताना मुंबईकरांचा या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद महाराष्ट्राला नशामुक्तीकडे नेण्याचे पाऊल आहे, असे वर्षा विद्या विलास यांनी सांगितले.

Web Title: Celebrate the New Year in a pure way, not in a hurry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.