गाव-शहरात अन् शाळा-कॉलेजात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 10:46 AM2019-06-21T10:46:22+5:302019-06-21T10:46:58+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगसाधना आणि योगतपश्चर्याचा दिललेा संदेशही शाळांमधील विद्यार्थ्यांना सांगण्यात आला.
मुंबई - 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. राज्यातील प्रत्येक गाव-शहरांमध्ये आणि शाळा-कॉलेजात आज सकाळी उत्साहातच योग दिन साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रांची येथे हजेरी लावून पाचवा योग दिन साजरा केला. देशातील अनेक शाळांमध्ये योगदिन मोठ्या उत्साहाने एखाद्या सणाप्रमाणे साजरा केला जातो.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगसाधना आणि योगतपश्चर्याचा दिललेा संदेशही शाळांमधील विद्यार्थ्यांना सांगण्यात आला. तसेच, स्वस्थ आणि निरोगी शरीरासाठी केवळ एक दिवसांपुरती योगासने न करता दैनंदिन जीवनातही योगासनं करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना देण्यात आला. अंधेरी पश्चिम येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल शाळेत पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी विशेष योग दिनाचे आयोजन केले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री देसाई यांनी विद्यार्थ्यांना शरीर व मनाच्या संतुलनासाठी योगाचे महत्त्व स्पष्ट केले. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योगा प्रशिक्षक ट्विंकल यांनी योगाचे धडे दिले.
शाळेतील नौदल छात्रसेनिक, स्काउट विद्यार्थ्यांनी या योगा वर्गाचा लाभ घेतला. योग हा 21 जून या योग दिनापुरता मर्यादित न राहता प्रत्येकाच्या दिनचर्येचा भाग असला पाहिजे असे आर्ट ऑफ लिविंगच्या प्रशिक्षक ट्विंकल यांनी सांगितले.