आरेच्या आदिवासी पाड्यात महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:00 AM2020-12-02T04:00:29+5:302020-12-02T04:00:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गोरेगाव पूर्व येथील आरेच्या खडकपाडा व निंबारपाडा येथे महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगाव पूर्व येथील आरेच्या खडकपाडा व निंबारपाडा येथे महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी शनिवारी साजरी करण्यात आली.
अभिषेक सामाजिक शैक्षणिक संस्था अंधेरी या संस्थेच्यावतीने संस्थेच्या अध्यक्ष सुनीता नागरे व रेश्मा परब तसेच तेथील रहिवासी व विद्यार्थ्यांनी महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरी केली.
त्यावेळी आदिवासी पाड्यातील मुलांना महात्मा जोतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया कसा रोवला, त्यांनी कशा प्रकारे स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले, महाराष्ट्रमध्ये महिलांसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये कशी सुरू केली, असा संवाद साधत महात्मा जोतिबा फुले यांची महती सुनीता नागरे यांनी विद्यार्थ्यांना कथन केली.
यावेळी या आदिवासी पाड्यातील प्रसाद मराठे, लक्ष्मण सुतार, वनीता सुतार, सुरेश मेस्त्री, अलका ठोमरे, सोनाली मोहिते आदी मान्यवर आणि येथील नागरिक, महिला व विद्यार्थी उपस्थित होते.
--------------------------------------------