उत्सव आरोग्याचा; ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची साद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:09 AM2021-09-04T04:09:37+5:302021-09-04T04:09:37+5:30
मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट अजूनही कमी झालेले नाही; तसेच कोरोनाची तिसरी लाट येण्याचीदेखील शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ...
मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट अजूनही कमी झालेले नाही; तसेच कोरोनाची तिसरी लाट येण्याचीदेखील शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सण साधेपणाने साजरा करीत ‘आरोग्य उत्सव’ साजरा करा, असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या याच आवाहनाला दक्षिण मुंबईतील ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साद दिली आहे.
ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक बांधिलकीतून स्तुत्य उपक्रम राबविण्यात गौरवास्पद कार्यरत आहे. यंदाही या मंडळाने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. मंडळातर्फे यंदा ‘उत्सव आरोग्याचा, उत्सव सुरक्षिततेचा’ असा उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश माणगावकर यांनी दिली.
या उपक्रमात गरजूंना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, डायलेसिस यांसारख्या दुर्धर आजारांची औषधे ५० टक्के सवलतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेचा सर्व गणेशभक्तांनी लाभ घ्यावा, असे माणगावकर यांनी सांगितले. तसेच अधिक माहितीसाठी साने गुरुजी मार्ग, ताडदेव येथील शिव गणेश मंदिर येथे संपर्क साधण्याचे आवाहन सेक्रेटरी सागर राणे यांनी केले आहे.
मंडळ राबवित आहे स्तुत्य उपक्रम
ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास या वर्षी ८२ वर्षे पूर्ण झाली. संपूर्ण राज्यात मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील सर्वोत्कृष्ट मंडळ म्हणून सर्वत्र हे गणले गेले आहे. गेल्या दीड-दोन वर्षांच्या कोरोनाकाळात ताडदेव शिवसेना शाखा, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि आमचा ताडदेवचा राजा मानवतेच्या दृष्टिकोनातून संवेदनशीलपणे विभागातील जीवन ज्योत संस्थेच्या वतीने कोविड संसर्गजन्य रुग्णांवर वैद्यकीय उपचार केंद्र, अलगीकरण, सुसज्ज आधुनिक सुखसोई बने कम्पाउंड महापालिका शाळेच्या तीन मजली इमारतीत हा स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे.