Join us

सेन्सॉर बोर्डाचे सीईओ राकेशकुमार कोठडीत

By admin | Published: August 20, 2014 2:28 AM

सेन्सॉर बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राकेश कुमार यांना काल सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले.

मुंबई : सेन्सॉर बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राकेश कुमार यांना काल सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले. आज विशेष न्यायालयाने त्यांना 22 ऑगस्टर्पयत पोलीस कोठडीत पाठविले.
कुमार लाच घेऊन सेन्सॉर सर्टिफिकेट देत होते, असा संशय सीबीआयला आहे. याआधी सेन्सॉर बोर्डाचा अधिकृत एजंट o्रीपती मिo्रा आणि बोर्डाच्या सल्लागार समितीचे सदस्य सर्वेश जैस्वाल यांना सीबीआयने गजाआड केले होते. यापैकी मिo्रा याला 7क् हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. 14 ऑगस्ट रोजी सीबीआयने ही कारवाई केली. चौकशीत मिo्रा, जैस्वाल यांनी कुमार यांच्या नावे लाच मागितल्याचे उघड झाले होते. त्यामुळे सीबीआयने या प्रकरणात कुमार यांच्याविरोधातही गुन्हा नोंदविला होता.
गुन्हा नोंदविल्यानंतर सीबीआयने या तिघांच्या निवासस्थानी व कार्यालयात छापे घातले. त्यापैकी कुमार यांच्या निवासस्थानाहून 33 महागडी घडय़ाळे, सुमारे 1क् लाखांची रोकड सापडली. पैसे आणि घडय़ाळे कशी मिळवली, यांचा स्नेत काय, या सीबीआय अधिका:यांच्या प्रश्नांना कुमार समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे कुमार यांना अटक करण्यात आली. 
दरम्यान, आज कुमार यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. कुमार यांना सात दिवस पोलीस कोठडीत धाडावे, अशी मागणी सीबीआयचे वकील अॅड. ओमप्रकाश यांनी केली. कुमार आणि अन्य अटक आरोपींनी प्रमाणपत्र देताना मोठा घोटाळा केल्याचा संशय सीबीआयला आहे. कुमार यांची बँक खाती, लॉकर तपासायचे आहेत, असे अॅड. प्रकाश यांनी न्यायालयाला सांगितले.  (प्रतिनिधी) 
 
25 लाखांची लाच?
सीबीआय सूत्रंच्या माहितीनुसार बोर्डाच्या सल्लागार समितीचे सदस्य सर्वेश जैस्वाल याने कुमार यांना ऑगस्टमध्ये दीड लाख रूपये दिल्याची कबुली दिली. अंधेरीतल्या एका मॉलमध्ये कुमार यांनी पैसे घेतले. अन्य आरोपीच्या जबाबानुसार त्याने कुमार याच्या नावे गेल्या आठ महिन्यात 18 ते 25 लाखांची लाच घेतली. ही रक्कम कुमार याच्या निवासस्थानासह त्या त्या ठिकाणी पोहोचविण्यात आली.