‘शतकपूर्ती’स्मरणिका आता इ बुक स्वरूपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:10 AM2021-09-09T04:10:18+5:302021-09-09T04:10:18+5:30
मुंबई - पार्ले टिळक विद्यालयाची ‘शतकपूर्ती’ ही स्मरणिका आता मोबाइल, लॅपटॅाप आणि संगणकावर वाचता येणार आहे. शतकपूर्ती स्मरणिकेच्या ...
मुंबई - पार्ले टिळक विद्यालयाची ‘शतकपूर्ती’ ही स्मरणिका आता मोबाइल, लॅपटॅाप आणि संगणकावर वाचता येणार आहे. शतकपूर्ती स्मरणिकेच्या ई पब बुकचे औपचारिक प्रकाशन झाले असून गूगलच्या प्ले बुक्स वर ‘शतकपूर्ती’ स्मरणिका उपलब्ध आहे. त्यासाठीची लिंक संस्थेच्या संकेतस्थळावर दिली आहे. पार्ले टिळक विद्यालयाच्या शतकमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनने ‘शतकपूर्ती‘ स्मरणिका प्रसिद्ध केली. या स्मरणिकेचे प्रकाशन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक हर्डीकर सर यांच्या हस्ते जून२०२१ मध्ये झाले. शाळेचे माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक यांच्या महत्त्वपूर्ण सहभागातून ही स्मरणिका आकारास आली आहे. शाळेच्या शंभर वर्षांच्या रोमहर्षक वाटचालीचा धावता आढावा यात घेण्यात आला आहे. तर अनेक जणांनी आपल्या शालेय जीवनातील रम्य आठवणींना उजाळा दिला आहे.