आवश्यकता भासल्यास कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयाच्या इमारतीचे स्वायत्त संस्था, आयआयटी अथवा समकक्ष संस्थेमार्फत स्ट्रक्चरल आॅडीट करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधान परिषदेत दिली. राष्ट्रवादी सदस्य विद्या चव्हाण यांनी शताब्दी रुग्णालयाच्या निकृष्ट बांधकामाबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर दोन टप्प्यात शताब्दी रुग्णालयाचे बांधकाम झाले असून पहिल्या टप्प्यात ४० कोटी खर्चुन आरसीसीचे स्ट्रक्चर उभारण्यात आले. आवश्यकता भासल्यास आयआयटी, स्वायत्त अथवा समकक्ष संस्थेमार्फत स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले.
...तर शताब्दी रुग्णालय इमारतीचे होणार आॅडिट
By admin | Published: March 19, 2015 12:59 AM